रायगड जिल्हयातील 42 टक्के विद्यार्थ्यांकडे अद्याप आधार कार्डच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करण्यासाठी आधार कार्ड मागितल्या नंतर ही माहिती उजेडात आली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळांमधून आधार नोंदणीसाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आङे.रायगडमध्ये 6 ते 14 वयोगटातील 3 लाख 93 हजार 986 विद्यार्थी आहेत त्यापैकी तब्बल 1 लाख 63 हजार 207 विद्यार्थ्याकडे आधार कार्डच नसल्याची माहिती पुढे आली आहे.यामध्ये पनवेल तालुका आघाडीवर असून तेथे 67 हजार विद्यार्थी आधार कार्डापासून वंचित आहेत.त्यामुळे आता विद्यार्थांना आधार देण्यासाठी विशेष मोहिम आखली जाणार आहे.विद्यार्थ्यांना आधार मिळाले नसले तरी रायगडमधील 26 लाख 34 हजार 200 लोकांपैकी 22 लाख 43 हजार 872 लोकांना म्हणजे 85 टक्के जनतेला आधार कार्ड मिळाले आहेत.