किनाऱ्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐेरणीवर

0
720

रायगड जिल्हयातील मुरूड जंजिरा येथे रविवारी चेंबूरमधील सहा जणांचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू आणि दिवेआगर येथे पुणे येथील एका युवकाच्या समुद्रात बुडून झालेल्या मृत्यूने रायगडमधील समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रायगड जिल्हयाला 250 किलो मिटरचा सुंदर समुद्र किनारा लाभला आहे.हिरवीगर्द वनराई आणि सुंदर समुद्र किनारे यांचा आनंद घेण्यासाठी अलिकडे रायगडात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.मात्र उत्साहाच्या भरात अनेक पर्यटकांकडून निसर्गाच्या रिती नियमांकडे दुर्लक्ष होते आणि त्यातून दुःखद प्रसंगांना तोंड द्यावे लागते.जिल्हयातील अलिबाग,मुरूड,काशिद,नागाव,आक्षी,दिवेआगर,रेवदंडा,किहीम,श्रीवर्धन दिघी,हरिरहेश्वर येथील किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते .या पैकी काही किनारे धोकादायक असून तेथे गेल्या सहा महिन्यात सतरा पर्यटकांचे बळी गेले आहेत.गेल्या दहा वर्षातील हा आक़डा 125च्या वर आहे.
समुद्रात वारंवार होणारे अपघात टाळायचे असतील तर पर्यटकांनी संयम पाळण्याबरबोरच शासकीय यंत्रणेने देखील सुरक्षा विषयक उपाय योजना करणे गरजेचे आहे.जिल्हयात अलिबाग नगरपालिकेने काही उपाययोजना केल्यानतंर अलिबागच्या समुद्रात बुडून मरण पावणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.अलिबाग नगरपालिकेने सुसज्ज बोटींसह सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.समुद्रात दोर टाकून घोक्याची सीमारेषा ठरवून दिलेली आहे,किनाऱ्यावर धोक्याची सूचना देणारे फलक,मृत्यू पावलेल्यांची आकडेवारी,सायरन अशा व्यवस्था ,पोलिसांची गस्त अशा व्यवस्था केल्या आहेत.अन्यत्र मात्र अशा व्यवस्था नसल्यानं वारंवार अपघात होतात.रविवारी जिल्हयात झालेले दोन अपत्राताच्या वळेसही या त्रुटी दिसूून आल्याने जिल्हयातील काही महत्वाच्या किनाऱ्यांवर तरी सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका व्हाव्यात अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here