महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच राजभवनात भेट घेतली.यावेळी राज्यपालांकडे महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू कऱण्याची मागणी कऱण्यात आली.त्यावर राज्यपालांनी असा कायदा झाला पाहिजे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे असे स्पष्ट केले होते.राज्यपालांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आता आमचं निवेदन आणि त्यासोबत आपले पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.त्याबाबतची माहिती देणारे एक पत्र राज्यपालांचे मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी एक पत्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला पाठविले आहे.हे पत्र आज मिळाले आहेमुख्यमंत्री सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत तेथून परतल्यानंतर ते यासंदर्भातला काही निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.