पत्रकार संरक्षण कायदा लगेच लागू करा – अनंत दीक्षित

0
690

पत्रकार संरक्षण कायदा लगेच लागू करा – अनंत दीक्षित

महाराष्ट्रात पत्रकारांवरील वाढते हल्ले पाहून सर्वच पत्रकार अस्वस्थ असून ज्यांना जेथे संधी मिळेल तेथे कायद्याचा विषय प्राधान्याने उपस्थित केला जाऊ लागला आहे. काल सालापुरात श्रमिक पत्रकार संघाचयावतीनं ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचा रंगा अण्णा वैद्य पुरस्कार देऊन सन्मान कऱण्यात आला.बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आपल्या भाषणात अनंत दीक्षित यांनी पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करतानाच “महाराष्ट्रात आता विलाविलंब पत्रकार संरक्षण कायदा झााला पाहिजे” अशी मागणी केली.यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी “मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौर्र्‍यावरून परत आल्यानंतर आपण या प्रश्‍नावर त्यांच्याशी बोलणार असून येत्या आठ दिवसात हा विषय मार्गी लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न करू” असे आश्‍वासन  दिले आहे.मंत्र्यांचे आश्‍वासन आहे,त्यावर किती विश्‍वास ठेवायचा,असे आश्‍वासनं यापुर्वीही अनेकदा दिले गेले असले तरी आम्ही राज्यपालांना भेटल्यानंतर आणि घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनीही “कायदा झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार” असल्याचं सांगितल्यानंतर सत्ताधारी या मागणीचा गांभीर्याने आणि सकारात्मक भूमिकेतून विचार करायला लागले आहेत.त्यामुळे चंद्रकांत पाटील काही प्रयत्न नक्की करतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.अर्थात या आश्‍वासनावर आपण विसबून राहता कामा नये,ज्या ज्या पत्रकारांना आणि जेथे जेथे संधी मिळेल तेेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्ायचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे अशी माझी विनंती आहे.पाठपुरावा आणि आंदोलन अशा दोन्ही पातळ्यांवर आपली ही लढाई चालू राहिली पाहिजे.येत्या 13 जुलै रोजी महाराष्ट्रात मोठे आंदोलन कऱण्यात येणार आहे.त्यासंबंधीचा अंतिम निर्णय उद्याच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here