या कोकणात माझ्या…

0
924

 25 जानेवारी 1998 हा दिवस कोकणच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला आहे.हा तोच दिवस होता,ज्या दिवशी कोकण कन्या एक्स्प्रेस मुंबई ते मडगावपर्यत पहिल्यांदा धावली.पश्चिमेला अथांग अरबी समुद्र,मधून धावणारा सतरा क्रमाकाचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि या रस्त्याच्या पुर्वेला असलेल्या सह्याद्रीच्या अंगा-खांदयावर बागडत आणि नागमोडी वळणं घेत कोकण कन्या जेव्हा पहिल्यांदा  कोकणी धावली तेव्हा कोकणी जनतेनं या कोकणात माझ्या आली आगी न गाडी अशी गाणी गात कोकण केन्येंचं स्वागत केलं .कार ण नाथ पै,मधु दंडवते या नेत्यांनी 1966 मध्ये कोकण रेल्वेचं स्वप्न पाहिलं.ते प्रत्यक्षात येण्यासाठी नंतरची 30-32 वर्षे लागली.कोकणात पडणारा प्रचंड पाऊस,येणारे महापुर,पाच-दहा किलो मीटरवर बदलणारी भौगोलिक परिस्थिती,महाकाय डोंगर,खोलच खोल दऱ्या,दरडी कोसळण्याचा सततचा धोका,घनदाट जंगल अशा साऱ्या प्रतिकूल परिस्थितीत कोकण रेल्वेने हा प्रकल्प तर पूर्ण केला पण आपल्या चक्रात मानवानं केललं आक्रमण निसर्गाला मानवलं नाही हे नंतर कोकण रेल्वेसमोर निर्माण झालेल्या समस्यांच्या श्रखलांतून स्पट झालं. कोकण रेल्वे रूळावर आल्यानंतरही निसर्गाने मानवाला फटके लगवायला सुरूवात केली होती.निसर्गाच्या कोपाचा पहिला तडाका बसला तो 22 जून 2003 रोजी.कारवार- मुंबई ही गाडी एका बोगद्याजवळ पटरीवरून खाली घसरली आणि त्यात 52 प्रवासी ठार आणि शंभरावर जखमी झाले..या घटनेनंतर कोकण रेल्वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला.देशभर टीकाही झाली.मग काही उपाययोजना कऱण्यात आल्या.दरडी किंवा माती रेल्वे रूळावर पडू नये म्हणून डोंगराला जाळ्या लावण्यात आल्या,धोकादायक ठिकाणी सुरक्षा कठडे उभारण्यात आले.रेल्वे ट्रॅक वाहून जाऊ नयेत किंवा त्याखालचे भराव कुमकवत होऊ नयेत म्हणून ते अधिक मजबूत केले गेले,मोठ्‌या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आलं.आणि नेहमीची 120 किलो मीटरची वेग मर्यादा पावसाळ्यात प्रती तास 75 किलो मीटरपर्यत कमी केली गेली.मात्र निसर्गासमोर हे सारे उपाय कुचकामी ठरले आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 16 जून 2004 रोजी कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा रेल्वे अपघात झाला.त्यात 20 प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले.नंतरच्या काळातही रेल्वे मार्गावर होणारे हे अपघात रोखण्यात कोकण रेल्वेला यश आलेलं नाही.या वर्षात झालेला सर्वात मोठा अपघात म्हणून 4 मे 2014च्या रोह्या जवळ झालेला अपघाताचा उल्लेख करता येईल.या अपघातात 18 जण ठार झालेे ..अनेकजण जखमी झाले.त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी मालगाडीचे सात डबे रूळावरून घसरून अपघात झाला. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 27 तास ठप्प झाली पडली.
दक्षिणेतील राज्यांना मुंबईशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून कोकण रेल्वेकडं पाहिलं जातं.या मार्गावरून दररोज 35 गाड्या ये जा करीत असतात.मात्र दुहेरी मार्गाचं काम आजही पूर्ण झालेलं नसल्यानं एखादा अपघात झाला तर मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला कित्येक तास जातात..अशा प्रसंगी प्रवाश्यांचे अतोनात हाल होतात.मात्र कोकण रेल्वेची अगतिकता आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादाही माहिती असल्यानं कोकणी जनता ही सारी संकंटं निमूटपणे सहन करताना दिसते आहे.
कोकण रेल्वेच्या नावावर वेगवेगळे विक्रम नोंदविले गेलेेले आहेत.सर्वात उंच पूल,सवाधिक लांबीचे बोगदे,हे कोकण रेल्वेचं वैशिष्य समजलं जात.22 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर धावायला लागली आहे.कोकण रेल्वेच्या शिरपेचातील हा मानाचा तुरा समजला जातो.,भविष्यात बुलेट ट्रेन किंवा हायस्पीड ट्रेनही कोकण रेल्वे मार्गावरून धावणार असल्याचं सांगितलं जातं हे सर्व स्वागतार्ह असलं तरी किमान पावसाळ्यात तरी कोकण रेल्वे समोर असलेलं निसर्गाचं आव्हान कमी व्हायला तयार नाही या वास्तवाकडं दुर्लक्ष करता येत नाही.कोकण रेल्वेचा प्रवास आल्हाददायक आणि आनंद देणारा आहेच तो सुरक्षित व्हावा एवढीच कोकणी जनतेची अपेक्षा आहे.

– शोभना देशमुख –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here