म.हि.पाटील रायगड कॉग्रेसचे अध्यक्ष

0
736

रायगड कॉग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष श्री.म.हि.पाटील यांची रायगड जिल्हा कॉग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नेमणूक कऱण्यात आली आहे.आजच त्यांना पक्षाकडून यासंबंधीचे पत्र मिळाले आहे.
रायगड जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष आर.सी.घरत हे पनवेलमधून निवडणूक लढवत असल्याने ही नवी नेमणूक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.म.हि.पाटील हे निष्टावान कॉग्रेस जणांपैकी एक समजले जातात.जिल्हा अध्यक्ष करण्याचे आश्वासन तर म.हि.पाटील यांना अनेकदा मिळाले पण यापदाने त्यांना अनेकदा हुलकावणी दिली आहे.क ुशल संघटन असलेल्या म.हि.पाटील यांनी कॉग्रेसच्या माध्यमातूनन अनेक लढे लढवले आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हा कॉग्रेसमधील एक अभ्यासू नेता आणि उत्तम वक्ता अशी त्यांची ओळख आहे.त्यांच्या निवडीबदद्ल त्याच्या चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.म.हि.पाटील यांचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here