म्हणे आम्ही जनमताचा आरसा

  0
  933

  आज रविवार.दैनिकाच्या पुरवण्यांचा दिवस.पुरवण्या म्हणजे वाचकांसाठी मेजवाणी.मी देखील सकाळीच सारे अंक चाळतो.वाचतो.दैनिकांच्या या पुरवण्यातून साधारणतः आठवड्यातील महत्वाच्या घटनांचं प्रतिबिंब उमटत असतं.गेली आठ पंधरा दिवस महाराष्ट्रात पावसानं दडी मारलीय.ग्रामीण भागातील वातावर कमालीचं चिंताग्रस्त आहे.पाऊस कधी येणार या शिवाय खेड्यापाड्यात दुसरी चर्चा नाही.तालुक्याच्या बाजारपेठाही याच चिंतेनं ग्रासलेल्या दिसतात.परंतू या परिस्थितीची वार्ता आमच्या अनेक दैनिकाच्या संपादकांपर्यत पोहोचलीय असं दिसत नाही.कारण आजच्या रविवार पुरवण्यात दुष्काळी स्थिती सोडून अन्य विषयांवरच कव्हरस्टोरीज आहेत.अर्थात लोकसत्ता आणि प्रहार त्याला अपवाद आहेत.लोकसत्तानं लोकरंग मध्ये पहिल्या पानावर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतलेला आहे.,तर प्रहारनं आपल्या प्रवाह या पुरवणीत काळ तर मोठा कठीण आहे हा दुष्काळावर भाष्य करणारा लेख कव्हरस्टोरी म्हणून दिला आहे.पुढारीनं बहार मध्ये भारत-पाक संबंधावरची कव्हरस्टोरी दिलीय तर सामनानं उत्सवमध्ये रामराज्य ते अच्छेदिन या विषयावर कव्हर स्टोरी दिली आहे.महाराष्ठ्र टाइम्सनं संवादमध्ये राजकारणाची शेकोटी आणि उत्सवाचं कवित्व हा लेख कव्हरस्टोरी म्हणून छापला आहे.सकाळनं सप्तरंग मध्ये तर चक्क बाहुबली या चित्रपटाच्या स्पेशल इफेक्टवर फोकस टाकला आहे.लोकमतनं मंथनमधून ग्रीस च्या दिवाळखोरीवर भाष्य करणारी स्टोरी छापलीय.

  ही सारी प्रमुख दैनिकं.ती सारी महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतात.ग्रामीण भागातही या दैनिकांचा खप आणि दबदबा आहे.तरीही ग्रामीण भागाचं प्रतिबिंब त्यांच्या रविवार पुरवणीतून उमटू नये याचं सखेद आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.पावसाअभावी शेतकर्‍यांच्या तोडंचं पाणी पळालंय.या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत सरकारची भूमिका जेवढी शेतकरी पुरक असायला हवी तशी ती दिसत नाही.आपण जर जनमनाचा आरसा असू तर त्यात ग्रामीण जनतेच्या हाल अपेष्टाचं चित्र दिसायला हवं होतं.मात्र तसं दिसत नाही.इंडिया आणि भारत यांचे प्रश्‍न वेगळे आहेत असं वर्तमानपत्रांच्या संपादकांना वाटतं ही चिंतेची गोष्ट आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here