मुरुड ते श्रीवर्धनदरम्यानच्या राजपुरी खाडीमध्ये येत्या सोमवारपासून फेरीबोट सेवा सुरू होणार आहे. त्याचा लाभ पर्यटकांना विशेषत: वाहनधारकांना होणार आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देणाऱ्या या सेवेमुळे अलिबाग ते श्रीवर्धन हे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. आगरदांडा ते रोहिणी अशा २० मिनिटांच्या जलप्रवासामुळे पर्यटकांचा वेळ आणि पसा दोन्ही वाचणार आहेत.
रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची संकल्पना अद्यापही पूर्णत्वास गेली नसल्याने कोकणातील खाडय़ा पुलाने जोडल्या गेलेल्या नाहीत. परिणामी कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्था पर्यटनाच्या व प्रवाशांच्या दृष्टीने अपूर्णच राहिली आहे. असे असले तरी सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सव्र्हिसेसने कोकणातील दाभोळ ते धोपावे, जयगड ते तवसाळ आणि वेश्वी ते बाणकोट या खाडय़ांवर फेरीबोट सेवा यापूर्वीच सुरू केली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील प्रवाशांची सोय तर झालीच आहे शिवाय पर्यटक मोठय़ा प्रमाणावर वळू
लागले आहेत.
आता राजपुरी खाडीत आगरदांडा ते रोहिणी या जलमार्गावर फेरीबोट सेवा सुरू करण्यास सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सव्र्हिसेसला महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने परवानगी दिली आहे. येत्या सोमवारपासून २८ एप्रिलपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश मोकल यांनी दिली. अलिबागला येणाऱ्या पर्यटकांना मुरुडमाग्रे दिवेआगर, हरिहरेश्वर श्रीवर्धनला जाण्यासाठी पुन्हा महामार्गावर येऊन वळसा घालून जावे लागते. मात्र आता प्रवाशांना मुरुडवरून थेट जवळच्या मार्गाने श्रीवर्धन तालुक्यात जाणे शक्य होणार आहे. या फेरीबोटमधून प्रवाशांना आपल्या वाहनांसह प्रवास करता येणार आहे. परिणामी अलिबाग ते श्रीवर्धन हे अंतर ५० किलोमीटरने कमी होऊन वेळ व पशांची बचत होणार आहे. त्यासाठी सुवर्णदुर्गची ऐश्वर्या बोट सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे.
मागील काही वर्षांत पर्यटकांची पावले कोकणाकडे मोठय़ा संख्येने वळताहेत. कोकणातील विशाल समुद्र, निसर्गरम्य किनारे, पर्यटनस्थळांनी पर्यटकांना भूल घातली आहे; परंतु वाहतुकीच्या अपुऱ्या साधनांमुळे त्यांची काहीशी गरसोय होताना दिसत होती. मात्र सुवर्णदुर्गच्या फेरीबोट सेवेमुळे ही अडचण दूर झाली असून सागरी महामार्गावरील रेवस ते राजापूपर्यंतचा प्रवास हा किनारपट्टीवरून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत करणे शक्य झाले आहे.
सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ही सेवा सुरू राहणार असून आपत्कालीन परिस्थितीत रात्री उशिराही सेवा देण्यात येईल. विद्यार्थ्यांना मासिक पासची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. मोकल यांनी सांगितले