समुद्र दुर्घटनेनंतर जवळपास ओस पडलेले मुरूड शहर कालपासून पुन्हा पर्यटकांनी गजबजू लागले आहे.1 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर पर्यठकांनी मुरूडकडे पाठ फिरविली होती.सारे बुकिंगही रद्द केले गेले होते.मात्र कालपासून विकेन्ड सुरू झाल्याने मुरूडला पर्यकांची पुन्हा गर्दी दिसू लागली आहे.जंजीरा पाहण्यासाठी राजापुरीच्या धक्क्यावरही पर्यटक गर्दी करीत आहेत.ज्या ठिकाणी अपघात झाला त्या मुरूडच्या किनार्र्यावरही पर्यटक दिसत असले तरी ते समुद्रापासून अंतर ठेऊनच आनंद घेत असल्याचे चित्र आहे.सध्या मुरूडच्या किनार्यावर सिगल या पाहुण्या पक्षांची गर्दी आहे हे पक्षी न्याहळण्यातही पर्यटक वेळ घालवत असल्याचे दिसते.पर्यटक वाढले असले तरी अजूनही पुर्वी सारखी गर्दी नसल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे स्थानिक छोट्या व्यावसायिकाचे म्हणणे आहे.दरम्यान समुद्रात फ्लोटिंग बॉलबसवून ठराविक अंतराच्या पुढे समुद्रात न उतरण्याच्या सूचना पर्यटकांना दिल्या जात आहे.मुरूड पालिकेचा गार्डही तैनात केल्याचे दिसते.-