मुरूड जवळ कासव जखमी अवस्थेत मिळाले

0
856
अलिबागनजिक रेवदंडा समुद्र किनारी जखमी अवस्थेत देवमासा सापडल्याची घटना ताजी असतानाच काली सायंकाळी मुरूडनजिक नांदगाव समुद्र किनारी एक मोठे कासव जखमी अवस्थेत आढळल्याने जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न पुनश्‍च निर्माण झाला आहे.डावा पाय तुटलेल्या अवस्थेतील हे कासव वनविभागाकडे सुपूर्त कऱण्यात आले असून त्याच्यावर उपचार करून ते समुद्रात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.मुरूडच्या समुद्रात मोठ्या जहाजांचा वावर सातत्याने वाढला असल्याने त्याची धडक बसून जखमी होणार्‍या जलचरांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त कऱण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here