मुंबई-गोवा महामार्गा बाधितांना योग्य मोबदला आणि पर्यायी जमीन दयावी – एस.एम.देशमुख

0
811
पेण- दि.10 ( देवा पेरवी )
 
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासोबत सरकारने बाधितांना योग्य मोबदला आणि पर्यायी जमीन दयावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमत्रक तथा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम.देशमुख यांनी युसूफ मेहेरअली सेंटर बांधणवाडी येथे झालेल्या महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या जाहीर सभेत केली आहे. यावेळी शेकडो प्रकल्पग्रस्थ उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्थाना मार्गदर्शन करताना एस.एम्.देशमुख पुढे म्हाणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना बाधित कुटुंबांवर अन्याय व्हावा अशी भूमिका रायगड मधील पत्रकारांची कधीच नव्हती. परंतु विस्थापितांच्या बाबतीतील सरकारच्या नाकर्तेपणाचे खापर मात्र पत्रकारांवर फोडले जात असल्याचे सांगून महामार्गाच्या रुंदीकरणासोबत सरकारने बाधितांना योग्य मोबदला आणि पर्यायी जमीनही दयावी अशी मागणी करत यापुढे न्यायमिळेपर्यंत रायगडातिल पत्रकार प्रकल्पग्रस्थांच्या पाठीशी असल्याचे एस.एम.देशमुख यांनी जाहिर केले.
संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच पंधरा मीटर मधील बाधितांना योग्य मोबदला तर जमीन मालकांना दुप्पट मोबदला मिळवून दिल्याबद्दल जाहीर सभेत युसुफ मेहेरअली युवा बिरादरीचे समन्वयक संतोष ठाकूर यांना पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देवून गौरविण्यात आले. मात्र जो पर्यंत गावठाणातील जमिनीच्या बदल्यात जमीन मिळत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचा लढा थांबवू नका असे आवाहन डॉ.जि.जि.पारीख यांनी केले.
यावेळी गावठाण जमिनीच्या प्रस्तावांबाबत लवकरच महामार्ग कृती समितीला घेवून जिल्हाधिका-यांसोबत बैठकीचे आयोजन करणार असल्याचे आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
तर १ जानेवारी २०१५ च्या अगोदर सक्षम अधिका-यांनी ३ (ग) चे निवाडे जाहीर करून ज्यांना कमी मोबदला दिला आहे अशा सर्व महामार्ग बाधितांना २०१३ च्या कायद्यानुसार चारपट मोबदला मिळविण्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करणार असल्याचे ऍडव्होकेट निहा राऊत यांनी सांगितले.
यावेळी कामगार नेते मधू मोहिते, सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट सुरेखा दळवी,अरुण शिवकर, पत्रकार मिलिंद आष्टीवकर, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी आदीं मान्यवर उपस्थित होते.यावेळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here