मुंबई-गोवा महामार्गावर लोणारे नजिक आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.परस्पर विरूध्द दिशेने येणार्‍या ट्रक एकमेकावर आदळून झालेल्या या अपघातात दोन्ही ट्रकमधील चालक आणि क्लीनर ठार झाले.तसेच ट्रकच्या समोर असलेला मोटरसाईकल स्वार देखील या अपघातात ठार झाला आहे.पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.अपघात एवढा भीषण होता की,गाडयात अडकलेले मृतदेह काढणे देखील अशक्य झाले होते.अपघाताची बातमी समजताच पोलीस आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत.मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

 बातमीबरोबरचा फोटो जुना आहे.आजच्या अपघाताचा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here