मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस संज्ज

0
708

गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलिसांनी त्यासाठी महामार्गावर पाच पोलीस उपअधिक्षक,13 पोलीस निरिक्षक,34 पोलीस उपनिरिक्षक अशा एकूण 52 पोलीस अधिकार्‍यांसह 428 पोलीस ,18 पोलीस जीप्स,20 मोटर सायकली,54 वॉकीटॉकी तैनात करण्यात येत आहेत.उद्यापासून हा ताफा महामार्गावरील वाहतूक सुरळीत कऱण्यासाठी कार्यरत असेल.महामार्गावरील होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचेही आवाहन केले आहे.त्यानुसार खारपाडा ते वडखळ या टप्प्यासाठी आपटा-रसायनी-दांडफाटा-खालापूर-पाली- वाकण या मार्गाचा अवलंब करण्याचे सांगण्यात आले आहे.वडखळ ते नागोठणे या टप्प्प्यासाठी वडखळ-पायनाड-पेझारी-नागोठणे- वाकण-माणगाव या मार्गाचा पर्याय सूचविण्यात आला आहे.कशेडी घाटातील कोंडी टाळण्यासाठी राजेवाडी टोलनाका-शिरगाव-फाळकेवाडी-नातूनगर -खेड या पर्यायी मार्गाचा अवलंब कऱण्यास सांगितले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here