मी अँकर
अँकरिंग हे ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हे.त्यासाठी लागते विद्‌वत्ता,हजरजबाबीपणा,समयसूचकता,अनेक गोष्टींचं व्यवधान,ताज्या घटनाची माहिती,भाषेवर हुकुमत वगैरे.हे गुण ज्यांच्या अंगी असतात तेच चांगले अँकर होऊ शकतात.अँकर होण्यासाठी काय करावं लागतं,अँकरींग करतानाचे चांगले-वाईट अनुभव आणि गंमती-जमती,आपण ऐकणार आहोत ज्याना आपण दररोज छोट्या पडद्यावर बघतो त्या प्रतिथयश अँकर्सकडूनच.मी अँकर या चर्चासत्रात सहभागी होत आहेत.एबीपी माझाचे मिलिंद भागवत,झी-24 तासचे अजित चव्हाण आयबीएन-लोकमतचे अमोल परचुरे,जय महाराष्ट्रच्या सुवर्णा जोशी,मी मराठीच्या वृषाली यादव,आणि टीव्ही-9चे वैभव कुलकर्णी.
मराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसाव्या अधिवेशनात 6 जून रोजी दुपारी 2 ते 4 वेळात मी अँकर हे चर्चासत्र होत आहे.एका वेगळ्या विषयावरील या चर्चेचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा अशी आग्रहाची विनंती आहे.

मराठी पत्रकार परिषद- मराठी पत्रकारांची पहिली संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here