भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय अमित शहा यांच्या ‘टेंपल एंटरप्रायजेस’ या कंपनीचीे उलाढाल भाजपची सत्ता आल्यानंतरच्या एका वर्षातच 16 हजार पटीने वाढल्याची बातमी ‘द वायर’ या वेबसाईटने रविवारी प्रसिध्द केल्यानंतर स्वाभाविकपणे भाजप नेत्यांना चांगल्याच मिर्च्या झोंबल्या.ही बातमी प्रसिध्द झाल्यानंतर कॉग्रेसने लगेच त्यासंदर्भात आरोप केल्यानंतर देशातील राजकी वातावरण यामुद्यावरून गरम झाले.कॉग्रेसने अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.द वायर या वृत्त वेबसाईटच्या प्रतिनिधी रोहिणी सिंग यांच्या नावे बातमी प्रसिध्द झाल्यानंतर बातमीत उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत व्यवस्थित खुलासा करण्याऐवजी द वायरला धमकी दिली गेली.100 कोटींचा दावा दाखल करण्याची!.त्यानंतर आज वायरच्या रिपोर्टर रोहिणी सिंग यांच्या विरोधात शंभर कोटीचा खटला दाखल करण्यात आला असून या खटल्यात फाऊंडर एडिटर सिध्दार्थ वरदराजन,सिध्दार्थ भाटिया,एमके वेणु,मोनोबिना गुप्ता,पामेला फिलिपोज याना पार्टी करण्यात आले आहे.वायरची मालकी असलेला ट्रस्ट ‘फाऊंडेशन फॉर इंन्डिंपेंडंट जर्नालिझमवर’ही खटला दाखल करण्यात आला आहे.हा सारा प्रकार वरवर कायदेशीर वाटत असला तरी तो माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचाच प्रयत्न आहे हे उघड आहे.आपल्या संदर्भात प्रसिध्द झालेली एखादी बातमी चुकीची आहे असे वाटत असेल तर संबंधित प्रकाशन,संपादक आणि रिपोर्टरवर बदनामीचा खटला दाखल कऱण्याच अधिकार नक्कीच आहे.याचा फटका देशातील अनेक संपादकांना बसलेला आहे.बदनामीच्या खटल्यात अनेक पत्रकारांना शिक्षा झालेली आहे,काहींनी तुरूंगवासही भोगलेला आहे.मात्र आता एवढया मोठ्या रक्कमेचा खटला दाखल करायचा की,ती रक्कम संबंधित संस्थेला भरणेच शक्य होणार नाही त्यामुळे खटला मागे घेण्यासाठी पत्रकारांनी संबंधितांपुढे लोटांगण घातले पाहिजे असा प्रयत्न होत आहे.शिवाय पुन्हा संबंधित व्यक्ती किंवा संस्थेच्या विरोधात कोणी बातमी छापणार नाही असाही प्रयत्न अशा खटल्यातून करण्याचा प्रयत्न असतो.जय अमित शहांनी हाच मार्ग अवलंबत रोहिणी सिंग आणि त्यांच्या अन्य सहकार्‍यांच्या विरोधात थेट शंभर कोटींचा खटला दाखल केला आहे.द वायर ही न्यूज वेबसाईट चालविणार्‍या संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे आम्हाला त्याची कल्पना नाही.मात्र वेबसाईटचे उत्पन्न आणि अन्य गोष्टींचा विचार करता द वायर 100 कोटी रूपये भरू शकेल असे वाटत नाही.कदाचित हे जय शहा यांनाही माहित असावे त्यामुळेच त्यांनी एवढ्या मोठ्या रक्कमेचा दावा दाखल केला असावा.मागे एका इंग्रजी वाहिनीच्या विरोधातही असाच 100 कोटींचा दावा दाखल केला गेला होता.त्याचे नंतर काय झाले त्याची बातमी आली नसली तरी माध्यमांची मुस्कटदाबी करण्यासाठीच अशा मार्गांचा अवलंब केला जातो हे उघड आहे.बातमी खोटी आहे असं जर भाजप आणि जय शहा यांचे म्हणणे असेल तर ती खोटी कशी हे त्यांनी सप्रमाण सिध्द करायला हवे.मात्र पियुष गोयल यांनी या संदर्भात जो खुलासा केला आहे त्यात त्यांनी कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये वाढ झाल्याचे नाकारले नाही.त्यांचे म्हणणे असे आहे की,झालेली वाढ कायदेशीर आहे.अशी कोणती जादू जय शहा यांच्याकडे आहे की,सत्ता प्राप्तीनंतरच्या एका वर्षाथ थेट 16 हजार पटीने उलाढाल वाढते.त्याचा खुलासा झालेला नाही.तो करून बातमी खोटी ठरविण्याची संधी असताना ज्यांनी हे प्रकरणा काढले त्या वायरलाच न्यायालयात खेचून त्यांचा आवाज बंद कऱण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.वरकरणी याला आक्षेप घेता येत नसला तरी हा माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे हे उघड दिसते.

भाजपची सत्ता आल्यानंतर विविध पध्दतीनं माध्यमांची मुस्कटदाबी होताना दिसतेय.विरोधात असलेल्या वाहिन्यांवर बंदी घालणे,विरोधातल्या वाहिन्या ताब्यात घेणे,छोटया वृत्तपत्रांच्या विविध प्रकारे माना आवळणे,संपादकांच्या नोकर्‍या घालविणे असे प्रकार तर सुरूच आहेत.त्याच बरोबर अलिकडच्या काळात काही प्रत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.काही पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत.हे सारं कमी होतं म्हणून की काय आता थेट शंभऱ कोटीचे खटले भरून सनदशीर मार्गाने पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.या सार्‍या प्रकारांना पत्रकारांनी सामुहिक विरोध केला पाहिजे.मराठी पत्रकार परिषद,किंवा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला अशा प्रकारे माध्यमांची होत असलेली मुस्कटदाबी अजिबात मान्य नाही हे आम्ही येथे स्पष्ट करू इच्छितो.

———————————————————————

खालील मजकूर सुधाकर जाधव यांच्या वॉलवरून साभार.

या त्याच रोहिणी सिंग आहेत … !
————————————–
रोहिणी सिंग यांनी २०११ मध्ये वडेरा-डीएलएफ व्यवहार उघडकीस आणले आणि भाजपने गांधी परिवारा विरुद्ध प्रचाराची राळ उडविली. त्यावेळी कॉंग्रेसने किंवा गांधी परिवारातर्फे कोणीही रोहिणी सिंग यांना धमकावले नाही की शिवराळ भाषेत त्यांचा उद्धार केला नाही. मोदींच्या सत्तेत येण्याला रोहिणी सिंग यांच्या शोध पत्रकारीतेचा मोठा हातभार लागला. आता याच रोहिणी सिंग यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या पुत्राचे प्रताप उघडकीस आणले तर भाजपचे ट्रोल्स त्यांच्यावर तुटून पडले आहेत. संघ संस्कृतीनुसार त्यांचे चारित्र्यहनन सुरु आहे आणि शाह यांच्या एन्काऊंटर संस्कृतीनुसार धमकावणे सुरु आहे. रोहिणी सिंग या गोष्टीना घाबरत नाहीत ही गोष्ट वेगळी. त्यांच्या विरुद्धच्या मोहिमेने त्यांचे नाही तर सत्ताधारी पक्षाचे आणि त्यांच्या नेत्यांचेच चारित्र्य आणि चलन उघडे पडले आहे. #जय हो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here