एस.एम.देशमुख यांचा मुख्यमंत्र्यांकडून ‘गौरव’

0
1505

पत्रकार संरक्षण कायद्याचे श्रेय
एस. एम. देशमुख यांना :देवेंद्र फडणवीस

मुंबई :”पत्रकार संरक्षण कायद्याचे श्रेय एस. एम. देशमुख यांचे आहे हे कोणी नाकारू शकत नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस. एम देशमुख पत्रकारांसाठी करीत असलेल्या काया॓चा गौरव केला .
मराठवाडा लोकविकास मंचच्यावतीने मराठवाडा भूषण, मराठवाडा मित्र, मराठवाडा गौरव पुरस्कारांचे वितरण शनिवारी मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, विरोधात असल्यापासून आम्ही देशमुख यांच्या बरोबर होतो, त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर पत्रकारांची मागणी मान्य करणे ही आमची नैतिक जबाबदारी होती. मात्र त्यासाठी देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे कायद्याच्या संदर्भातले त्यांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही. पत्रकारांचा संघर्ष कधी संपत नसला तरी कायदा करून आम्ही एक मुक्काम गाठला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी लोकविकास मंचचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी, देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नासाठी आपल्या चांगल्या नोकरीवर कसे पाणी सोडले हे विस्ताराने सांगितले. देशमुख यांनी राज्यात पत्रकारांचे मोठे संघटन उभे करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ उभी केली.तया माध्यमातून कायद्यासाठी बारा वषे॓ सुरू असलेली लढाई यशस्वी करून दाखविली असे सांगताना आ. मेटे म्हणाले, सरकार कायदा करेल असे मला वाटत नव्हते. हे मी एका काय॓क़मात देशमुख यांना सांगितले देखील होते. मात्र देशमुख यांनी चिकाटीने हा प़शन लावून धरल्याने हा कायदा सरकारला करावा लागला. हा कायदा म्हणजे दुधारी शस्त्र आहे, तरीही कायदा करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखविले त्याबद्दल मेटे यांनी मुखमंत्रयानाही धन्यवाद दिले.
या काय॓क़मात ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना मराठवाडा भूषण, नाना पाटेकर यांना जाहीर झालेला मराठवाडा मित्र पुरस्कार त्यांच्या प़तिनिधीने स्वीकारला.उदयोगपती राम भोगले, सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी, डॉ. भारती लव्हेकर, प्रशासकीय अधिकारी महेश झगडे आणि पत्रकार एस. एम देशमुख यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकारांची मोठी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here