माथेरान नगरपालिकेच्या शंभर कोटींच्या अर्थसंकल्पास मजुरी

0
857

रायगड जिल्हयातील माथेरान नगरपालिकेच्या शंभर कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या माथेरान नगरपालिकेच्या बैठकीत हा अर्थसंकल्प मांडला गेला.त्यात पर्यटन विषयक विकासाबरोबरच शहराच्या सर्वागिंण विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
अवकाश निरिक्षण,प्रवासी माहिती केंद्र,जमिनीची धूप थांबविणे,रस्त्याचंी दुरूस्ती,तसेच काही प्रक्षणीय स्थळांची दुरूस्ती आदिंसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद कऱण्यात आली आहे.
माथेरान नगरपालिकेच्या शंभर कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून लहान आणि मध्यम शहरांसाठी असलेल्या योजनेतून माथेरानला 75 कोटी रूपये मिळतील अशी अपेक्षा अर्थसंकल्पात व्यकत्‌ कऱण्यात आली आहे.याशिवाय प्रवासी करातून तीन कोटी,हॉटेल टॅक्समधून बारा लाख,सहायक अनुदानातून एक कोटी,पर्यटन अनुदानातून दोन कोटी रूपये मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here