माथेरानमध्ये आता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा

0
705

माथेरानमधील मानवी रिक्षांच्या जागेवर आता बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा सुरू कऱण्यास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू कऱण्याची घोषणा पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केल्याने माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पर्यावरणाला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून दस्तुरी नाक्याच्या पुढे माथेरान परिसरात कोणत्याही आधुनिक वाहनास परवानगी नाही.साईकलला देखील माथेरानमध्ये बंदी आहे.अशा स्थितीत आजारी किंवा वृध्द व्यक्ती किंवा महिलांना दस्तुरी ते माथेरान हे तीन किलो मिटरचे अंतर पार करण्यासाठी एक तर घोडे किंवा हात रिक्षांचा वापर करावा लागतो. मानसांना रिक्षात बसवून दस्तुरीची कठीण चढण चढणे हे रिक्षावाल्यांसाठी मोठे दिव्य असते.मात्र रोजीरोटीसाठी अनेकजण वर्षानुवर्षे हे अत्यंत जिकरीचे ,जिवघेणे आणि अमानवीय काम करीत असतात.रिक्षा चालकांची या गुलामगिरीतून सुटका व्हावी आणि हातरिक्षांच्या ऐवजी त्यांना बटरीवर चालणाऱ्या पर्यावरण पूरक रिक्षांसाठी मान्यता द्यावी अशी मागणी माथेरानमधील काही सामाजिक कार्यकर्ते गेली काही वर्षे सरकारकडे करीत होते . याबाबत मानवी हक्क आयोगाकडेही तक्रार दाखल क़रण्यात आलेली असतानाच आता रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना मानवी रिक्षांच्या जागेवर पर्यावरण पुरक बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षांना परवानगी देण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे हाताने रिक्षा ओढणाऱ्यांची एक प्रकारे चाललेल्या गुलामगिरीतून मुक्तता तर होईलच त्याच बरोबर पर्यटक आणि माथेरानपासून दो न किलो मिटर अंतरावर असलेल्या शाळेत जाणा़ऱ्या विद्यार्थ्यांीचीही त्रास संपणार आहे .पालकमंत्र्यांच्या घोषणेचे बॅटरीवरील रिक्षांसाठी सातत्यानं पाठपुरावा क रणारे माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी स्वागत केले आहे.
शोभना देशमुख माथेरान-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here