माथेरानची ट्रेन कायमची बंद होणार नाही

0
768
माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी माथेरानची मिनी ट्रेन कायमची बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी स्पष्ट केल्याने माथेरानकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.माथेरान ट्रेनची दोन इंजिन्स अन्यत्र हलविण्यात आल्याने माथेरानची ट्रेन कायमची बंद होणार असल्याची चर्चा दोन दिवस माथेरान-नेरळमध्ये सुरू होती.त्यावरून संतापाची भावना व्यक्त होत होती.या पार्श्‍वभूमीवर गोयल यांनी केलेल्या खुसाश्याने माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे.”मिनी ट्रेन बंद होत असल्याच्या अफवेत तथ्य नसून इंजिन अधयावत करण्यासाटी दार्जिलिंगला पाठविण्यात येत आहेत.ही इंजिन्स अद्ययावत करून परत माथेरानला आणली जाणार आहेत.या अगोदर देखील दोन इंजिन्स दार्जिलिंगला नेण्यात आले होते” असे गोयल  यांनी स्पष्ट केले.मे मध्ये दोन वेळा इंजिन्स रूळावरून घसरल्याने माथेरानची रेल्वे बंद करण्यात आली होती.ती सुरू करावी यासाठी माथेरानकरांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप ती सुरू झालेली नसल्याने माथेरानकर अस्वस्थ होते.त्यातच दोन इंजिन्स अन्यत्र हलविण्यात येत असल्याच्या बातमीने अस्वस्थतेत भर पडली होती.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here