माथेरानचा उद्या वाढदिवस

0
716

समुद्र सपाटीपासून 791.5 मीटर उंचीवर असलेलं आणि रायगड जिल्हयातील थंड हवेचं ठिकाणं अशी ख्याती असलेलं माथेरान आज 164 वर्षांचं होत आहे.मुंबई नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या ह्यू मॅलेटनं 21 मे 1850 रोजी माथेरानच्या डोंगरमाथ्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि तेव्हापासून माथेरानची जगाला ओळख झाली. माथेरानचं सौदर्य,तेथील थंड आणि निर्भेळ हवा यामुळं स्वतः मॅलेट पहिल्याच भेटीत माथेरानच्या प्रमात पडला आणि 1851 मध्ये त्यानं माथेरानमध्ये पहिला बाईक नावाचा बंगला उभा केला.या साऱ्या घटनांच्या स्मृती जागविण्यासाठी दरवर्षी 21 मे हा दिवस माथेरानचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. माथेरानच्या वाढदिवसाचं औचित्यसाधून यंदा 19 मे पासून माथेरान महात्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध उपक्रमांचं आणि कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलं आहे.माथेरानचा इतिहास सागणारं,माथेरानचा निसर्ग दाखविणारं आणि माथेरानच्या संस्कृतीचं दर्शन घडविणारं प्रदर्शनही माथेरानमध्ये भरविण्यात आलं आहे. .माथेरानच्या वाढदिवसानिमित्त आज माथेरानमध्ये मिरवणूक काढण्यात येत असून प्रसिध्द कवी अरूण म्हात्रे माथेरान अभिमान गीताचं सादरीकऱण करणार आहेत.हा माथेरान महोत्सव 26 मे पर्यत चालणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय सावंत यांनी दिली.

1850मध्ये माथेरानचा शोध लागल्यानंतर 1905 मध्ये माथेरान नगरपालिका स्थापन झाली आणि 1907 मध्ये माथेरानची रेल्वे सुरू झाली.माथेरानची झुकझुक गाडी आज पर्यटकांचं खास आकर्षण ठरली आहे.त्यामुळंच माथेरानच्या विलोभनीय निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी देशभरातील हजारो पर्यटक दररोज माथेरानला भेट देत असतात.

शोभना देशमुख अलिबाग-रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here