पेण ( टीम बातमीदार ) रायगड जिल्हयातील शेकापचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री मोहन पाटील यांचे आज सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या वाक्रुळ गावी निधन झाले.ते 82 वर्षांचे होते.त्यांच्या मागे मुलगा आमदार धैर्यशील पाटील,स्नुषा असा परिवार आहे.आज सायंकाळी 4 वाजता वाक्रुळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.
गेली काही महिने मोहन पाटील वृध्दापकाळाने आजारी होते.त्यांच्यावर पुणे येथे उपचारही कऱण्यात आले होते.मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा नसल्याने त्यांना घरी आणले गेले होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
पेण विधानसभा मतदार संघावर कमालीचा प्रभाव असलेल्या मोहन पाटील यांनी तब्बल पाच वेळा पेणचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते.विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात काही काळ ते राज्यमंत्री होेतेअनेक सामाजिक लढ्यात पुढाकार असलेले मोहन पाटील सामांन्य कार्यकर्त्यांशी जोडले गेलेले होते.भाई म्हणूनच ते जिल्हयात ओळखले जात. .त्यांच्या निधनाने रायगडवर शोककळा पसरली आहे.