‘माज’चे लोकमतने काढले वाभाडे

0
900

माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या कर्तबगारीचे(?) आज पुन्हा वाभाडे निघाले आहेत.मेक इन इंडियाची धुम सुरू असताना महाराष्र्ट सरकारचे माहिती आणि जनसंपर्क खाते मात्र बेपत्ता आहे.या कार्यक्रमाची कोणतीही माहिती शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडे नाही,एवढेच कश्याला कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना बोलाविले तेव्हा तेथे माहिती आणि जनसंपर्कचा एकही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता.शिवाय आग लागली त्यादिवशी म्हणजे रविवारी वृत्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी पुर्व परवानगी न घेताच बाहेरगावी निघून गेले होते.त्यामुळे पत्रकारांनी बातमीसाठी जेव्हा फोन केले तेव्हा कोणीच उपलब्ध होत नव्हते.माजच्या या भोंगळसुत्री कारभाराची लक्तरे वेशिवर टांकणारा विशेष रिपोर्ट सोमवारच्या लोकमतमध्ये अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.सरकारचे महत्वाचे खात्याचा कारभार कसा चालू आहे हे समजून घ्यायचे असेल तर वाचकांनी अतुल कुलकर्णा यांचा लेख मुद्दाम वाचला पाहिजे…काम सोडून राजकारणी बनलेल्या माहिती आणि जनसंपर्ककडे जरा लक्ष द्या अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे वारंवार केली आहे आता लोकमतंही मुख्यमंत्री जरा इकडही लक्ष द्या अशा साद घातली आहे.पाहू यात याचा काही उपयोग होतो का ते

lokmat-2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here