रत्नागिरी जिल्हयातील पत्रकारांना मनःपूर्वक धन्यवाद

0
1130

रत्नागिरी जिल्हयातील पत्रकारांना मनःपूर्वक धन्यवाद

रत्नागिरी जिल्हयातील पत्रकारांनी वेळोवेळी मराठी पत्रकार परिषदेवर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल परिषद आणि व्यक्तिशः मी आपले शतशः आभारी आहोत.

मराठी पत्रकार परिषद गेली 76 वर्षे पत्रकारांच्या हक्काचे लढे लढते आहे.नजिकच्या काळात मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन मिळावे आणि  पत्रकार संरक्षण कायध्यासाठी व्यापक लढा उभारला आहे.एवढेच नव्हे तर गरजू पत्रकारांना आर्थिक मदत मिळवून देणे,उपचारासाठी मुंबईत येणार्‍या पत्रकारांची निवास व्यवस्था करता यावी यासाठी परिषदेने पत्रकार आरोग्य सेवा कक्ष सुरू केला आहे.या कक्षाने गेल्या दोन महिन्यात किमान सहा पत्रकारांना सर्वतोपरी मदत केली आहे.ब्वड कॅन्सरशी मुकाबला करणार्‍या परभणीच्या शिवाजी क्षीरसागर तर मी परिषदेमुळेच जिवंत आहे असे कृतज्ञतेचे भाव व्यक्त करीत असतो.परिषदेने सुरू केलेल्या या सार्‍या सकारत्मक कामांना अधिक गती यावी,यासाठी परिषदेशी संलग्न असलेले जिल्हा संघ ज्या ज्या ठिकाणी मृतावस्थेत आहेत तेथे त्यांचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय परिषदेने घेतला.त्यानुसार गेल्या तीन महिन्यात सहा जिल्हा संघांच्या निवडणुका लोकशाही मार्गाने,परिषदेच्या घटनेने दिलेल्या अधिकारानुसार पार पडलेल्या आहेत.रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघ गेली 35 वर्षे मृतावस्थेत आहे.मी अध्यक्ष असल्याचा जे कांगावा करतात ते कागदोपत्री अध्यक्षच नाहीत.अध्यक्ष नसताना किंवा कोणतेही वैधानिक अधिकार नसताना त्यांनी बॅक खाते हाताळले आहे.यातले गांभीर्य वेगळे सांगण्याची गरज नाही.हे गांभीर्य लक्षात आल्यानंतर आणि नवे कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले तर आपली सारी पोलखोल होईल या भिताने निवडणूक प्रक्रियाच हाणून पाडण्याचा प्रयत्न केला गेला.त्यासाठी एका वर्तमानपत्राने सारे संकेत पायदळी तुडवत परिषदेच्याविरोधात आघाडीच उघडली.त्याला भिक घालण्याचे आम्हाला कारण नव्हते.कारण आम्ही जे निर्णय घेतले,जी प्रक्रिया राबविली ती परिषदेच्या घटनेनुसार,परिषदेच्या कार्यकारीमंडळाने वेळोवेळी केलेल्या ठरावांना अधिन राहून राबविलेली आहे.अभिजित हेगशेट्ये यांनाही घटना दिली गेली होती.त्यातील तरतुदींची माहितीही त्यांना दिली गेली होती.ते आता भलेही भूमिका बदलत असतील पण वस्तुस्थिती अशी आहे की,जे केलं ते सर्वांना विश्‍वासात घेऊन आणि पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार.त्यामुळं आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत.मात्र अस्थाई समितीच्या अध्यक्षांनी आज निवडणूक प्रक्रिया रद्द केली गेल्याचां आम्हाला कळविण्यात आलं.निवडणूक प्रक्रिया चुकीची आहे असं जर अभिजित हेगशेट्ये याचं म्हणणं असेल तर ते अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकले असते .त्यानी असं न करता थेट निवडणूकच रद्द केलेली आहे.हा अधिकार त्यांना कोणी दिला हा प्रश्‍न शिल्लक राहोतच?.या सार्‍या राजकीय साठमारीत आणि कातडीबचाव धोरणामुळे रत्नागिरी जिल्हयातील सामांन्य पत्रकारांची ससेहोलपट होता कामा नये.कारण त्यांना संघटीत होण्याचा,हक्कासाठी लढण्याचा,एखादया संस्थेचा सदस्य होण्याचा नक्की अधिकार आहे.हा अधिकार नाकाराणारे ढुढ्डाचार्य कोण लागून गेलेत?.दुदैर्वानं बहुसंख्य पत्रकारांना परिषदेच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचं कारस्थान आज रत्नागिरीत खेळलं जात आहे.परिषदेची गुडवील वापरायची आणि तरूण पत्रकारांना संधीच द्यायची नाही ही खेळली जात आहे.ती व्यक्तीशाः मला मान्य नाही.जास्तीत पत्रकारांनी संघटीत झालं पाहिजे ,आपले प्रश्‍न सोडवून घेतले पाहिजेत असं मला वाटतं आणि त्यासाठीच माझ्या करिअरवर पाणी सोडून मी पत्रकारांना संघटीत कऱण्याचं काम गेली काही वर्षे करीत आहेत.हे करीत असताना खिश्याला तोषीस लाऊन मी सारं करीत आहे..परिषदेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी परिषदेचा मासिक जमा खर्च फेसबुक पेजवर टाकला जातो.असं करणारी मराठी पत्रकार परिषद ही देशातील पत्रकारांची पहिली आणि एकमेव संघटना आहे हे मी येथे अभिमानानं सागू इच्छितो.हिंमत असेल तर रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघान  आपल्या पस्तीस वर्षाचा खर्च ऑनलाईन टाकावा.पण ते शक्य नाही.त्यासाठी स्वच्छ हात आणि नैतिक अधिष्ठान लागते.सचोटीनं आम्ही काम करीत असताना,घटनेनुसारचं सारं काही चाललेलं असताना यांना अधिकार नाहीत अशी हाकाटी मारणं चालू आहे.त्यासाठी दबावतंत्र वापरलं जात आहे.काहीही करून निवडणूक प्रक्रिया हाणून पाडायची आणि तरूण पत्रकारांना मुख्य प्रवाहात येऊच द्यायचं नाही हा यामागचा डाव आहे.तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.कधी नव्हे ते रत्नागिरी जिल्हयातील पत्रकार आज संघटीत झाले आहेत.त्यांच्या या एकत्र येण्याला आमच्यादृष्टीनं फार महत्व असल्याने ही एकी अभंग ठेवण्यासाठी आम्हाला जे करता येणं शक्य आहे ते आम्ही करीत राहणार आहोत.हा विश्‍वास आपल्याला देण्यासाठी आणि आपले आभार व्यक्त कऱण्यासाठी मी माझे सहकारी किरण नाईक,मलिंद अष्ठीवकर,शरद काटकर तसेच परिषदेचे अन्य पदाधिकारी येत्या बुधवारी 24 फेब्रुवारी 2016 रोजी चिपळूणला येत आहोत.चिपळूण मध्यवर्ती आहे आणि चिपळूणशी मांझं भावनिक नातं आहे.आपण मुंबई-गोवा महामार्गाचा लढा लढत असताना चिपळूणला ऐतिहासिक मशाल मार्च झाला होता आणि परिसरातील पाचशेवर पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते.पत्रकारांचा तेव्हाचा जोश मी आजही विसरलो नाही.त्यामुळं लढ्याची पार्श्‍वभूमी असलेल्या या भूमितूनच नव्यानं एकीची हाक देण्यासाठीच चिपळूणची निवड केली आहे.मला आपणासर्वाशी या निमिततनं भेटता आलं,संवाद साधता आला,आपल्या मनातील शंका -कुशंका दूर करता आल्यातर मला आनंद होईल.तेव्हा आपण जरूर यावं ही पुनश्‍च विनंती.आपण माझ्यावर दाखवत असलेल्या विश्‍वासाल तडा जाऊ देणार नाही हे वचन मी आपणास देत आहे.

कळावे

आपलाच

 एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here