भाजपला बहुमत मिळेल-स्वराज 

0
821

हाताला काम,शेतीला पाणी,आणि पोटाला अन्न अशी विकासाची त्रिसूत्री घेऊन भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत असल्याने लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील भाजपला पूर्ण बहुमत मिळेल अशी खात्री केंर्दीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली आहे.

पनवेल येथील भाजपचे उमेदवार प्र्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ गुरूवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत स्वराज बोलत होत्या.
आपल्या भाषणात त्यांनी कधी काळी समृध्द संपन्न म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार,घोटाळे,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,गुन्हेगारी अशा घटनांमुळेच गाजत राहिला.महाराष्ट्राला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न कऱणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार हरबन्स सिंह,रवीद्र कुशवाह आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here