( संतोष पवार )
निरुपणातून समाज प्रबोधन करताना समाजाला विधायक कार्याची प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चा माथेरान नगर परिषदेने गौरव केला . रेवदंडा येथे जावून आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन दादा धर्माधिकारी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला . माथेरानच्या नगराध्यक्षा दिव्या डोईफोडे उप नगराध्यक्ष राजेश दळवी माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी , दयानंद डोईफोडे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका या प्रसंगी उपस्थित होते .
महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने ठिकठिकाणी सामाजोपोयोगी कार्य सुरु आहे .यातूनच प्रेरणा घेऊन माथेरान या प्रसिध्द पर्यटन स्थळी वृक्षारोपण , गाव स्वच्छता मोहीम आणि शार्लोट लेक तलावातील गाळ काढून तलाव स्वच्छ करणे असे विधायक उपक्रम यशस्वी पणे राबविण्यात आले .सक्षम समाज निर्मितीच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे .या विधायक उपक्रमांमुळे शासनाच्या लाखो रुपयांची बचत झाली आहे .
माथेरानच्या पर्यावरण रक्षणा साठी महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आप्पासाहेब आणि सचिन दादा धर्माधिकारी यांना मानपत्र अर्पण करण्यात आले .