मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मिटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला आज दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची पाहणी केली.त्यानंतर पेण नजिक उंबर्डे फाटा येथे घेतलेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे आदेश दिले.या बैठकीस पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह जिल्हयातील आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
कोकणाताील पत्रकारांनी सतत पाच वर्षे आंदोलनं केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग 17 चे काम 2011 मध्ये सुरू झाले.हे काम 2014मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र कंत्राटदार कंपन्या हे काम वेळेत पूर्ण करू न शकल्याने महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.आता कंत्राटदारांनी मार्च 2016 पर्यत कामपूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागितली असून शासनाने 2016 पर्यत काम पूर्ण कऱण्याचे सांगितले आङे.आता दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण न झाल्यास अधिकारी आणि कंत्राटदारांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.मुंबई-गोवा महामार्ग तीन जिल्हयातून जात असल्याने तीनही जिल्हयातील जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्र येत भूसंपादनाचा विषय मार्गी लावावा अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत.