कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून त्याचाच एक भाग म्हणून काल महाडमध्ये पोलिसांनी गावातून संचलन केले.लोकांमध्ये विश्वास निर्माण कऱणे,लोकांच्या मनातील भिती दूर करणे आणि निर्भयपणे मतदानासाठी लोकांनी बाहेर पडावे या हेतूने हे संचलन असल्याचे महाडचे पोलिस उपाधिक्षत विजय खऱात यांनी सांगितले.
या संचलनात महाड ठाण्याचे चार अधिकारी तीस कर्णचारी,औद्योगिक वसाहत ठाण्याचे तीस कर्णचारी,होमगार्ड,तसेच सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले जगदरी नऊ बटालियन्सचे 5 अधिकारी आणि पन्नास जवान या संचलनामध्ये सहभागी झाले होते.