महाडमध्ये दुसर्‍या दिवशी शोध कार्य सुरू 

0
649

महाडनजिकच्या सावित्री नदीच्या दुर्घटनेतील शोध मोहिमेला आज सकाळपासून पुन्हा सुरूवात झाली आहे.160 जवान आणि 12 बोटींच्या सहाय्यानं ही शोध मोहिम सुरू असल्याचे जिल्हा प्रसासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.शोध यंत्रणांनी आज लोहचुंबकाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून 300 किलो वजनाचं लोहचुंबक दोरखंडाच्या सहाय्याने नदीत सोडण्यात आलं आहे.कल्पना अशी आहे की,या लोहचुंबकाला बस किंवा अन्य खासगी गाड्या अडकून त्या सापडतील.लोहचुंबकाप्रमाणेच मोठ्या आकाराच्या गळाचा देखील वापर केला जात आहे.मात्र आजही महाबळेश्‍वर आणि महाड परिसराता जोरदार पाऊस कोसळत असल्याने शोध कार्यात अडचणी येत आहेत.समुद्राला ओहोटी असल्याने सावित्रीच्या पाण्याचा बर्‍यापैकी निचरा झाल्याने पाण्याची पातळी कमी झाल्याचे दिसत असले तरी पाण्याचा प्रवाह किंवा वेगमात्र कमी झालेला नाही असं तपासपथकाच्यावतीने सांगण्यात येत आहे.महाडची दुर्घठना होऊन आता 36 तास उलटले असले तरी हाती काही लागले नाही त्यामुळे बेपत्ता असलेल्या नागरिकांचे नातेवाईक आपले आप्तेष्ट सुखरूप असतील अशी आस धरून बसले आहेत– महाडमध्ये दुसर्‍या दिवशी शोध कार्य सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here