महाडमधील 110 शाळा बंद पडणार
अलिबाग- विद्यार्थी संख्येचे निकष बदलल्यानं महाड तालुक्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 110 प्राथमिक शाळांना टाळे लावले जाणार असल्यानं ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेत नाराजी व्यक्त होत आहे.महाड तालुक्यात 330 शाळा असून त्यातील जवळपास एक तृतियांश शाळा नव्या नियमानुसार बंद पडणार आहेत.
पटसंख्या दहा पेक्षा कमी संख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यापेक्षा पुर्वीच्या निकषांप्रमाणे 15 पटापर्यंत एकच शिक्षक ठेऊन त्या शाळा सुरू ठेवाव्यात कारण महाड तालुक्यात अनेक गाव दुर्गम भागात असून तिथं वाहतुकीची कोणतीच साधनं उपलब्ध नाहीत.पावसाळयात तर चार चार दिवस या गावांचा संपर्क तुटलेला असतो असं मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.