महसूल अधिकाऱ्यांनी सक्रीय व्हावे

0
794

महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कामकाज लोकाभिमूख, पारदर्शी आणि गतीमान करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनीआज येथे बोलताना केली.

जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

महसूल प्रशासन लोकाभिूख आणि गतीमान करण्यावर शासनाने सर्वोच्च भर दिला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी सुमंत भांगे म्हणाले, जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून महसूलप्रशासन अधिक पारदर्शि गतीमान करण्याचा प्रयत्न असून या अभियानातून गावागावात शिबीरे घेवून जनतेला भेडसवणारे प्रश्न आणि समस्यांची जागेवरच सोडवूणक करण्यास प्राधान्य दिले आहे. यापुढील काळातमहूसल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सुर्वण राजस्व अभियान अधिक गतीने राबविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी महसूल विभागाकडील कामकाजाचा विभागनिहाय व तालुकानिहाय आढावाही जिल्हाधिकारी श्री.सुमंत भांगे यांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here