मथळा नसलेली बातमी

0
1128

राजस्थान,मध्यप्रदेश आणि अन्य तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल देताना वृत्तपत्रांनी प्रभावी शिर्षक आणि आकर्षक मांडणीचा उपयोग केला आहे.पण एक दैनिक असं आहे की,त्यानं बातमीतर विस्तारानं दिलीय पण त्या बातमीला शिर्षकच नाही.इंदोरचं प्रजातंत्र हे ते दैनिक आहे.बातमीला शिर्षक नसलं तरी बातमीचा प्रभाव मात्र कायम आहे.बातमी देताना माध्यमांनी तटस्थ असलं पाहिजे.आपलं मत त्यात व्यक्त करू नये असं सांगितलं जातं.मात्र बहुतेक शिर्षकांमध्ये रात्रपाळीच्या मुख्य उपसंपादकाचं मत त्यात डोकावताना दिसतंय.मात्र प्रजातंत्र नं असं मत प्रदर्शन टाळत पराभव किंव ाविजय का झाला याचं विश्‍लेषण वाचकांवर सोपविलं आहे.वृत्तपत्रसृष्टीत कदाचित असा प्रयोग पहिल्यांदाच झाला असावा.
टेलिग्राफ या इंग्रजी दैनिकानं देखील वेगळा प्रयोग केलाय.निकालाची बातमी तर सविस्तर दिलीय पण त्यात राहूल गांधींचा भलामोठा फोटो दिलाय.आणि कॅप्शनच्या स्वरूपात ‘आता आम्हाला लढायचं आहे’ असं कॅप्शन बाजुला दिलं आहे.वृत्तपत्रांमध्ये दररोजचा अंक सजवताना वेगवेगळे प्रयोग केले जातात.नांदेडच्या लोकपत्र दैनिकानं राजीव गांधींची हत्त्या झाली त्या दिवशीचा अंक हातानं लिहून काढला होता.तो देखील एक वेगळा प्रयोग होता.आज बिनाशिर्षक बातमीचा प्रयोगही अनोखाच म्हणावा लागेल.

The gallery was not found!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here