अलिबाग- रायगड जिल्हयातील सातही विधानसभा मतदार संघातील मतमोजणी उद्या सकाळी सुरू होत असून अलिबागची मतमोजणी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात होत आहे. अलिबाग मतदार संघातील मतमोजणीसाठी 14 टेबल्स ठेवण्यात येत असून मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील असा अंदाज आहे.दुपारी 12 वाजेपर्यत निकाल अपेक्षित आहे.निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हयात दोन हजार पोलिसांची फौज तैनात कऱण्यात आली आहे.पोलिसांबरोबरच दंगल नियंत्रण पथक,स्ट्रयाकिंग फोर्स,शिघ्रकृती दल,केंर्दीय राखीव पोलिस फोर्सच्या,राज्य राखीव पोलिस दलाचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणेना कायदा आणि सुव्यवस्था स्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
रायगड जिल्हयात सात विधानसभा मतदार संघात 88 उमेदवार आहेत त्यांचा फैसला उद्या होणार असल्याने सर्वत्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

LEAVE A REPLY