टॉक शो सुरू आहे..अशा स्थितीत दोन अँकर चर्चा करण्याचे सोडून परस्परांवर भिडले तर..प्रेक्षकांनी काय करावं..असाच प्रश्‍न एका टीव्ही चॅनलच्या प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहिला नसेल.टीव्हीवर चालणार्‍या चर्चा आपण नेहमीच बघतो.चर्चेतील खडाजंगी देखील आपण रोज पाहतो.चचार्र् चालू असताना अँकरनं तटस्थ भूमिका घेत चर्चा भरकटणार नाही,चर्चा प्रवाही राहिल याची काळजी घेणे अपेक्षित असते.पण हे सोडून दोन अँकर वैयक्तिक पातळीवर येऊन परस्परांवर आरोप करतात तेव्हा प्रेक्षकांवर डोक्याला हात लावण्याचीच वेळ येते.दोन अँकर ऑन एअर भांडतानाचे चित्रही ओंगळवाणेच दिसतेय.पाकिस्तानातील एक टीव्ही चॅनलवर हा किस्सा घडला.त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरतो आहे.पाकिस्तानमधील डेली पाकिस्तानवर हा प्रकार घडला.चॅनलवर एक पुरूष आणि एक महिला बुलेटिन सादर करीत होते.न्यूज वाचण्यावरून दोघांमध्ये ऑनएअरच वाद सुरू झाला.तो एवढया टोकाला गेला की,पुरूष अँकर महिला अँकरला इसके नखरे कम नही होते असे बोलताना ऐकायला येत होते.या प्रकारामुळं बुलेटिनचा विचका तर झालाच पण चॅनलची आणि एकूणच इलेक्टॉनिक माध्यमांची इभ्रत चव्हाट्यावर आली.–
https://www.facebook.com/MediaLive92/videos/2007917769448779/?t=0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here