-बीडमध्ये पत्रकार करणार ऑनलाईन मतदान

0
1293

पारदर्शक कारभाराचा आग्रह सारेच धरतात पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते.मराठी पत्रकार परिषद या पत्रकारांच्या 77 वर्षे जुन्या संघटनेनं मात्र कसलाही गाजावाजा न करता पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाऊले टाकली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक व्यवस्थेत दुरूस्ती करून परिषदेशी संलग्न जिल्हा संघांच्या आणि परिषदेच्या जिल्हास्तरीय शाखांच्या निवडणुका ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.त्यानुसार देशात प्रथमच पत्रकार संघटनेची ऑनलाईन निवडणूक बीड जिल्हयात घेतली जात आहे.मराठी पत्रकार परिषद बीड,या परिषदेच्या शाखेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादीही प्रसिध्द झाली आहे.गरज पडल्यास 11 तारखेला मतदान घेतले जाणार असून ते ऑनलाईन पध्दतीनं घरी बसल्या बसल्या आपल्या आवडत्या उमेदवारास पत्रकार मतदान करू शकतील.बीड जिल्हयातील 400 सदस्य अशा पध्दतीनं प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावत असल्यानं तिकडं कमालीची उत्सुकता आहे.निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून तो खालील प्रमाणे आहे.

महाराष्ट्रातील पत्रकारांची आद्य संघटना *मराठी पत्रकार परिषद* राज्यात संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रथमच *online*(मोबाईल द्वारे)घेत असून या निवडणूक पद्धतीचे राज्यातील सर्व स्तरातून कौतुकही झाले.अशा पद्धतीने निवडणूक घेणारी राज्यातील पहिली संघटना ठरली.

 
पुणे जिल्ह्यात ही *online* निवडणूक पद्धत यशस्वी झाल्यानंतर *मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा* सन 2017-19 साठी ची कार्यकारिणी निवडणूक जाहीर करण्यात येत असून निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे घोषित करण्यात येत आहे.
 
★ *निवडणूक*
अध्यक्ष(1पद)
कार्याध्यक्ष(1पद)
सरचिटणीस(1पद)
कोषाध्यक्ष(1पद) या चार पदासाठी घेण्यात येणार.इतर पदे निवडून आलेली कार्यकारणी निवड करणार
 
★) *मतदार सदस्य यादी जाहीर करणे*-
बुधवार दि.08 मार्च2017 सकाळी 10वाजता मतदान हॉल मध्ये आणि (मराठी पत्रकार परिषद जिल्हा बीड या whatasaap ग्रुप द्वारे प्रकाशित )
 
★ *उमेदवारी फॉर्म वाटप* *व भरून घेणे*
-गुरुवार दि.09मार्च 2017 वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत.
 
★ *उमेदवार छाननी*
-गुरुवार दि09मार्च2017. सांयकाळी 04.30 ते 05.30.
 
★ *उमेदवार यादी जाहीर करणे*-
गुरुवार दि09मार्च2017रोजी सांयकाळी 06.00 वाजता .मतदान हॉल व मराठी पत्रकार परिषद जिल्हा बीड याwhatsaap ग्रुपद्वारे.
 
★ *उमेदवार फॉर्म माघार घेणे*
-शुक्रवार दि.10मार्च2017 सकाळी 09.30ते 11.30 पर्यंत.
 
★ *अंतिम उमेदवार यादी जाहीर करणे*
-शुक्रवार दि.10मार्च2017 सकाळी 12.30वाजता.
 
★ *मतदान*
शनिवार दि11 मार्च2017
सकाळी 10.30ते सांय.05.00पर्यंत.
 
★ *मतमोजणी*
शनिवार 11मार्च 2017
सांयकाळी 05.15 ते निकाल लागेपर्यंत.
 
★ *मतदान केंद्र ठिकाण*- कार्यालय दैनिक सुराज्य बीड.
 
★ *निवडणूक निरीक्षक*-
*श्री.बापूसाहेब गोरे*
-अध्यक्ष,पुणे जिल्हा पत्रकार संघ)
मोबाईल-9822222772
 
★ *निवडणूक अधिकारी*-
*श्री राजेंद्रजी आगवान*
(संपादक,सांयदैनिक रणझुंजार)
मोबाईल-9422741047
 
★ *निवडणूक सहाय्यक*-
*श्री विशालजी सोंळके*
(जिल्हा प्रतिनिधी,दै एकमत)
मोबाईल-9850536482
 
*महत्वाचे*Online मतदान प्रक्रियेचा डेमो दि.10 मार्च 2017रोजी मतदान कार्यालयात सांयकाळी 04 ते 04.30 दाखवण्यात येईल.
तसेच आॕनलाईन फेसबूक वरही डेमो प्रसिद्ध केला जाईल .
 
***************************
*निवडणूक निरीक्षक*
मराठी पत्रकार परिषद जिल्हा बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here