परभणीत निषेध

0
808

परभणी प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील दीघा येथे मंगळवार, २८ ङ्गेब्रुवारी रोजी अनाधिकृत इमारतींवरील कारवाईच्या वार्तांकनासाठी गेलेल्या झी मीडीयाच्या रिपोर्टर स्वाती नाईक व व्हीडीओ जर्नालिस्ट संदीप भारती यांना शिवीगाळ करून तेथील गावगुंडांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी राज्यभरातून तिव्र निषेध व्यक्त होत आहे. त्याच अनुषंगाने परभणीतील पत्रकारांनी जिल्हा प्रशासनामार्ङ्गत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

सदर मारहाणीत संदीप भारती हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर स्वाती नाईक याही जखमी आहेत. या भ्याड तसेच महिला पत्रकारवर झालेल्या हल्ल्याचा परभणी जिल्ह्यातील पत्रकारांच्यावतीने जाहिर निषेध करण्यात आला आहे. तसेच हल्ला करणार्‍या हल्लेखोरांवर शासनाने कठोर कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण कायदा त्वरीत अंमलात आणावा, अशी मागणी करून असे हेल्ले दुर्दैवी असून पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारे आहेत. यामुळे राज्यभरातील पत्रकार असुरक्षीततेची भावना व्यक्त करीत आहेत. भविष्यात शासनाने पत्रकार संरक्षण कायदा लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा मानस देखील पत्रकारांनी निवेदनात व्यक्त केला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी पत्रकार डॉ. धनाजी चव्हाण, आसाराम लोमटे, संतोष धारासुरकर, दिलीप माने, गजानन देशमुख, गिरीराज भगत, अशोक कुटे, विशाल माने, राजकुमार हट्टेकर, राणा संजय नाईक, बाळासाहेब काळे, विजय कुलदिपके, भास्कर लांडे, मोहसीन खान, विवेक मुंदडा, एकनाथ गोदम, लक्ष्मीकांत बनसोडे, शंकर इंगळे, कैलास चव्हाण, शिवाजी वाघमारे, प्रभू दिपके, माणिक रासवे, सुरेश मुळे, मोईन खान, लक्ष्मण मानोलीकर, मोरोती मुजमडे, मदन शेळके, प्रवीण चौधरी, अनिल दाभाडकर, सुधीर बोर्डे, महेश कोरडे, सुदर्शन चापके, महेश गाडे, प्रसाद आर्वीकर, शेख मुबारक, विठ्ठल वडकुते आदींसह पत्रकारारांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here