बाद झालेला प्रयोगच बार बार

0
898

 

–  शेक्सपिअरला राजकारण्यांनी सपशेल खोटं ठरवलंय.नावात काय आहे?  असा प्रश्न विचारून शेक्सपिअऱन “व्यक्तीस्तोम माजवू नका”  असा संदेश ज गाला दिला होता.शेक्सपिअऱ साहित्यिक होता,नाटककार होता.राजकारणी नव्हता . त्यामुळं त्याला नावातलं मोठेपण कदाचित कळलं नसेल.राजकारण्यांचं तसं नाही.नावातच सारं काही आहे हे ते ओळखून असल्यानं कोणत्या नावाचा केव्हा,कुठं ,कसा वापर करायचा हे त्यांना नक्की आणि चांगलं माहित असतं.रायगड लोकसभा मत दार संघातून सुनील श्याम तटकरे यांचा उमेदवारी अज र्  दाखल करून राजकारण्यांनी हे पुन्हा एकदा  दाखवून दिलंय.मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवाराशी नामसाधर्म्य असलेली व्यक्ती शोधायची आणि त्याचा अ र्ज दाखल करून मत दारामध्ये गोंधळ निर्माण करून मुख्य प्रतिस्पर्ध्याच्या मतांमध्ये विभाजन करायचं अशी यामागची योजना असते.मतदारांना वेंधळे,मूर्ख,नादान  समजून असे बाळबोध  प्रय़ोग केले जातात.वस्तुस्थिती तशी नाही.एक तर मतदार  आता राजकारणी समजतात तेवढा बावळट राहिलेला नाही.कोण,कशासाठी कोणत्या राजकीय खेळ्या करतोय हे तो  बरोबर ओळखून असतो.शिवाय ज्यांना लिहिता वाचता येते अशी मंडळी मुख्य उमेदवारोंऐवजी डमी उमेदवाराच्या पारड्यात मतं कशी काय टाकतील.?.ज्यांना लिहिता वाचता येतच नाही त्यांना नावाशी देणं-घेणं नसतं.ते आपणास हवं असलले चिन्ह शोधतात आणि त्या चिन्हासमोर  फुली मारतात किंवा बटन दाबतात.त्यामुळं वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या हया क्लुप्तीमुळं फार काही साध्य होतंय असं झालेलं नाही.तसा इतिहासही नाही. रायगडमध्ये 1991च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पहिल्यांदा मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावासारखेच नाव असलेला डमी उमेदवार उभा करण्याचा  प्रयोग केला गेला.त्याचं जनकत्व दत्ता खानविलकरांकडं जातं.शेकापतर्फे दत्ता पाटील निवडणुकीला उभे होते.त्यांना शह देण्यासाठी खानविलकरांनी शेवटच्या क्षणी “शेतकरी दत्ता पाटील”  या नावानं एका सामांन्य कार्यकर्त्याचा अ र्ज दाखल केला.हा प्रयोग पहिल्यांदाच होत होता आणि अजून मतदानाच्या पध्दतीबद्दलची तेवढी जागृती झालेली नव्हती.त्यामुळं शेतकरी दत्ता पाटलांना 15,645 एवढी चांगली मतं मिळाली.तेव्हा शेकापच्या दत्ता पाटलांना 1,79,933 मतं मिळाली तरी दत्ता पाटील अंतुलेंच्या विरोधात 39,706  मतांनी पराभूत झाले. – यातील डमी दत्ता पाटलांना पडलेली 15,645 मतं शेकापच्या दत्ता पाटलांच्या पारड्यात टाकली तरी ते  24,061 मतांनी पराभूत होतातच.म्हणजे दत्ता खानविलकर यांच्या चाणाक्ष डोक्यातून नि घालेली ही आयडिया फलद्रुप झाली नाही.पूर्णतः फेल  गेली.तरीही  हाच प्रयोग 1996 च्या लोकसभा निवडणुकातही झाला.शेकापतर्फे पुन्हा दत्ता पाटील उभे होते.यावेळे शेतकरी दत्ता पाटील , भाई दत्ता पाटील आणि आणखी एक दत्ता पाटील असे चार  दत्ता पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते.मात्र शेकापच्या दत्ता पाटलांना 1,84,634 मतं मिळाली आणि अन्य जे तीन दत्ता पाटील होते त्यांना तिघांना मिळून अवघी 7,141 मतं मिळाली होती.दत्ता पाटील तिसऱ्या स्थानावर गेले पण ते या डमी दत्ता पाटलांमुळे नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिवसेनेच्या अनंत तरे यांना २,09,180 मतं मिळाली होती.ही मतं दत्ता पाटील यांना पडलेल्या मतांपेक्षा 24,516 मतांनी जास्त होती.म्हणजे डमी दत्ता पाटील उभे नसते तरी दत्ता पाटील तिसऱ्या स्थानावरच फेकले जाणार होते.तात्पर्य “खानविलकर प्रयोग”  यावेळसही बारगळला  होता.1998मध्ये पुन्हा तेच झालं .शेकापच्या रामशेठ ठाकूरच्या विरोधात राम भास्कर ठाकूर हा डमी उमेदवार उभा केला गेला.शेकापच्या रामशेठ ठाकूरांना 2,48,353 मतं मिळाली.डमी राम ठाकूरला 1,719 मतं मिळाली.म्हणजे शेकप  उमेदवाराच्या एक टक्का मतंही मिळाली नाहीत.यावेळेसही हा नामसाधर्म्याचा प्रयोग असफल ठरला.2004च्या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसचे ए.आर.अंतुले मैदानात होते.त्यांना शह देण्यासाठी शेकापने ए.आर.अंतुले नावाचाच एक डमी उमेदवार उभा केला.कॉग्रेसच्या अंतुलेंना 3,12,225 मतं मिळाली आणि डमी अंतुलेंना बऱ्यापैकी म्हणजे 23,771 मतं मिळाली.तरीही विजय कॉग्रेसचे उमेदवार असलेल्या अंतुलेंचाच झाला.विवेक पाटील याच्यापेक्षा त्यांना 31,870 मतं जास्त पडली.यावेळेस डमी अंतुलेंना पडलेल्या मतांमुळे अंतुलयांचं  विजयाचं मार्जिन कमी झालं असं फार तर म्हणता येईल पण ही मतं निर्णायक ठरलेली नाहीत.म्हणजे प्रयोग पुन्हा फसलाच होता.

– लोकसभेच्या निवडणुकीत सातत्यानं फेल गेलेलाच नामसाधर्म्याचा फॉर्म्युला विधानसभेच्या वेळेसही वारंवार जिल्हयात वापरला गेल्याचं दिसेल.1995 मध्ये श्रीवर्धनमधून कॉग्रेसच्या रवींद्र राऊत यांना शह देण्यासाठी डमी रवींद्र राऊत उभे केले गेले.कॉग्रेसच्या चिन्हावर उभ्या असलेल्या राऊत यांना 30,658 मतं मिळाली तर डमी राऊतला 1008 मतं मिळाली.2004च्या विधानसभा निवडणुकात तर रायगड जिल्हयात बहुतेक ठिकाणी खानविलकरी  फॉर्म्युला वापरला गेला.श्रीवर्धनमध्ये शिवसेनेच्या श्याम सावंत यांच्या विरोधात डमी श्याम सावंत उभा केला गेला.डमीला 2999 मतं मिळाली.तरीही सेनेचे श्याम सावंत तेथून विजयी झाले.याच वेळेस पेण मध्ये  नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांची एकच ग र्दी झाली होती.शेकापने भाई मोहन पाटील यांना उभे केले होते.त्यांच्या विरोधात मोहन ग.पाटील,मोहन व्ही.पाटील,मोहन भाई डी.पाटील असे तीन मोहन पाटील उभे होते.तीनही डमी पाटलांना मिळून 7460 मतं पडली.शेकापच्या मोहन पाटलांना 41,905 मतं पडली.या निवडणुकीत मोहन पाटील पराभूत झालेे.मात्र ते डमी उमेदवारांना मिळालेल्या 7460 मतांमुळे पराभूत झाले असं म्हणता येणार नाही.कारण या निवडणुकीत जे विजयी झाले ते कॉग्रेसचे रवींद्र पाटील यांना 56,841 मतं मिळाली होती.रवी पाटील 14936 मतांनी विजयी झाले होते. – म्हणजे डमी उमेदवार उभे नसते तर मोहन पाटील विजयी झाले असते असा दावा करता येण्यासारखी स्थती नाही.गंमत अशी की,याच निवडणुकीत दोन डमी रवींद्र पाटीलही  उभे होते.रवीशेठ डी.पाटील आणि रवीशेठ बी पाटील अशी त्याची नावं होती.त्यांना सात-साडेसात हजार मतं पडली होती.

2004मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी नामसाधर्म्यचा प्रयोग  निर्धारपूर्वक हाणूनच पाडला.या निवडणुकीत शेकापच्या विरोधकांनी तब्बल सात  मीनाक्षी पाटील उभ्या केल्या होत्या.श्रीमती मीनाक्षी पाटील यांना पडलेली 1,393 मतं सोडली तर अन्य सहा डमी मीनाक्षी पाटलांना चार आकडी मतंही मिळाली नाहीत.सातही डमी मीनाक्षी पाटलांना मिळून केवळ 4,897 मतं मिळाली आहेत.शेकापच्या मीनाक्षी प्रभाकर पाटील यांना 59,961 मतं  मिळाली.याच निवडणुकीत कॉग्रेसच्या मधुकर ठाकूर यांच्या प्रमाणेच अन्य एक अपक्ष  मधुकर ठाकूर उभा होता.डमी मधुकर ठाकूर यांनाही केवळ 526 मतं मिळाली.म्हणजे ज्या अलिबागेतून हा फॉर्म्युला सुरू झाला होता त्याच अलिबागेत  हा फॉर्म्युला पूर्णतः अयशस्वी केला गेला होता.या वेळेस शेकापच्या मीनाक्षी प्रभाकर पाटील या ६०३८ मताने पराभुत झाल्या म्ह णजे ७  डमी मीनाक्षी  पाटील नसत्या तरी मीनाक्षी प्रभाकर पाटील १०००-१२०० मतांनी  पराभूत  होणार होत्या .कारण मधु ठाकुर यांना ६५६५३ मत मिळाले होती

 

– वरील सर्व विश्लेषणाचा अ र्थ एवढाच की, मुख्य उमेदवारासारखे नाव असलेल्या डमी उमेदवाराल जेवढी मतं मिळालीत तेवढ्या मतांनी मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार पराभूत झाल्याचं एकही उदाहरण जिल्हयात नाही.दत्ता पाटलांच्या विरोधात 1991 ला उभा केलेला शेतकरी दत्ता पाटील आणि नंतर एकदा अंतुलेंच्या विरोधात उभा केलेला ए.आर.अंतुले नावाचा डमी उमेदवार सोडला तर कोणत्याही उमेदवारांना पाच आकडी मतं मिळालेली नाहीत. – लोकसभा निवडणुकीत चार आकडी मतं फार महत्वाची असतात असं नाही.या सर्व पार्श्वभूमीवर शेकापने मोठी यातायात करून शोधून आणलेले सुनील श्याम तटकरे हे आघाडीचे सुनील तटकरे यांच्या मतांवर फार मोठा फरक पाडतील अस नाही. असा दावा मागील आकडेवारी  वरून करता येंईल .रायगड मत दार संघात एकूण  15,13,608 एवढी मतं  आहेत . यातले चार-दोन हजार मतं सुनील श्याम तटकरे यांना पडूही शकतील.पण या डमी उमेदवाराला पडणारी मतं निर्णायक असणार नाहीत हे नक्की.बऱ्याचदा अशी डमी उमेदवारांना त्यांच्या गावातली ,नातेवाईकांची मतं पडतात.काही मतं अनवधनानेही पडतात.मात्र अशी कोणत्याही कारणानं पडणारी मतं निर्णायक असत नाहीत हे वारंवार दिसून आलंय.त्यामुळं रायगडात डुप्लिकेट  सुनील तटकरे किंवा मावळात डुप्लिकेट लक्ष्मण जगताप किंवा श्रीरंग मारणे उभे करून निवडणुकीचा निकाल बदलेल किंवा डुप्लिकेट उमेदवारांचा निवणुकीवर निर्णायक परिणाम होईल  अशी अजिबात शक्यता नाही.वारंवार तोच तो फसलेला प्रयोग करून फार तर असा प्रयोग कऱणाऱ्याला  यातून आत्मीक समाधान मिळेल याखेरीज वेगळा कोणताच उपयोग होणार नाही.होत नाही हे वरील सर्व आकडेवारीवरून सिद्द झालंय.या प्रयोगाच्या मर्यादा माहित असल्यानंच असेल कदाचित पण पनवेल किंवा उरणमध्ये असे बाळबोध प्रयोग झाले नाहीत.घाटावरही असले उद्योग झालेले नाहीत हे मागील निवडणुकांवर एक कटाक्ष टाकला असता लक्षात येईल.

 एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की,तटकरे हे नाव पाटील किंवा ठाकूर यांच्या सारखे कॉमन नाही.तटकरे फार नाहीत.अशा स्थितीतही सुनील तटकरे  नावाचाच माणूस शोधून काढणे आणि त्याला अ र्ज भऱणे याबद्दाल शेकाप नेत्यांना दाद द्यावी लागेल.मात्र या साऱ्यातून हाती काही लागणार नाही.याचं कारण नेते समजतात तेवढा मत दार आता नादान अ थवा दुधखुळा राहिलेला नाही.त्यामुळे मत दारांना निर्बुन्ध समजून वारंवार केल्या जाणाऱ्या या ट्रीक्स बंद करून नव्या युगाला साजेशं नवं एखादं तंत्र विकसित करून त्याचा वापर करणे श्रेयस्कर ठरेल.

 

एस.एम.देशमुख 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here