बातमीदारीचा प्रवास एक प्रदशर्न

0
764

तुम्हाला ठाऊक आहे का, १९३६ साली टीव्हीवरून बातम्या प्रसारित झाल्या, तेव्हा निवेदिकांनी चेहऱ्याला हिरवा मेकअप आणि ओठांना हिरवी लिपस्टीक लावावी लागे म्हणून नाके मुरडली होती? बरं, तुम्हाला आजच्या चकाचक स्टुडिओमध्ये स्वतःला न्यूज रीडर म्हणून पहायची इच्छा आहे का? की जगभरातील आघाडीच्या वृत्तपत्रांचे पहिले पान पहायची उत्कंठा आहे?…की सगळेच जुनाट म्हणून ट्विटर, फेसबुकचा प्रभाव जाणून घ्यायचाय ?… ही सगळी जिज्ञासा एका भेटीत शमवायची, तर अमेरिकेच्या राजधानीतील न्युझिअम…अर्थात बातमीचा प्रवास व कंगोरे उलगडणाऱ्या संग्रहालयास भेट द्यायलाच हवी.

वॉशिंग्टन डीसीमध्ये पेन्सिल्वानिया अॅव्हेन्यू भागात २००८ पासून उभ्या असलेल्या न्युझिअम या वृत्तमाध्यमांविषयीच्या अनोख्या संग्रहालयाने सोशल मीडियालाही आता आपलेसे केले आहे. लोकशाहीमध्ये फ्री मीडियाचे स्थान काय आहे, हे अधोरेखित व्हावे व बातमीचे जगत आणि जनता यांच्यात एकमेकांविषयी जाणीव वाढावी, या उद्देशाने १९९७मध्ये या न्यूझिअमची संकल्पना प्रत्यक्षात आली. तेव्हा ते व्हर्जिनिया भागात होते. गेल्या सहा वर्षांपासून नव्या दिमाखात उभ्या राहिलेल्या न्यूझिअममध्ये सहा मजल्यांवरील १५ दालनांमध्ये वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओपासून इंटरनेटपर्यंत बातमीदारीचा प्रवास उलगडत जातो. ‘अवर लिबर्टी डिपेन्ड्स ऑन द फ्रीडम ऑफ द प्रेस…’ हे थॉमस जेफरसन यांचे वाक्य वृत्तपत्रस्वातंत्र्याची आठवण देत राहते. फ्रीडम फोरम हे ना नफा फाऊन्डेशन हे न्यूझिअम चालविते.

प्रत्येक ठिकाणी टचस्क्रीन, व्हीडिओ क्लिप, भित्तीचित्रे-माहिती यांचा सुरेख वापर केला आहे. न्यूझिअममध्ये दररोज जगभरातील ७०० हून अधिक वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांचे डॉक्युमेन्टेशन होते व इमारतीच्या दर्शनी भागातच त्यातील ८० मुखपृष्ठे आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य सभागारात ५७ बाय ७८ फुटांच्या भल्या मोठ्या स्क्रीनवर विंडो ऑन द वर्ल्डवर जगभरातील ठळक बातम्यांचे दर्शन घडते. पहिल्या मजल्यावर पुलित्झर पुरस्कार विजेत्या हजार छायाचित्रांची गॅलरी असून तिथेच फोटोग्राफर्सच्या अनुभवांविषयीच्या ३०० व्हिडीओ क्लिप्स आणि ४०० ऑडिओ क्लिप्सही आहेत. बर्लिन वॉल गॅलरीमध्ये पूर्व व पश्चिम जर्मनीच्या सीमा मिटल्या, तेव्हाच्या काँक्रीटच्या भिंतींचे १२ फुटांचे आठ अवशेष ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेले अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्ल यांचा पासपोर्ट येथे ठेवण्यात आलेला असून जगभरात ठिकठिकाणी आपले कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या १९०० पत्रकारांना श्रध्दांजली वाहणारे जर्नालिस्ट्स मेमोरिअल येथे आहे.9

वुई विल फाइट बॅक…’

विविध गॅलऱ्यांमधील काळजाचा ठाव घेणारी गॅलरी ही अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१च्या हल्ल्याच्या वेळच्या वृत्तांकनाची आहे. या हल्ल्यांचा दस्तऐवज टिपणारे छायाचित्रकार विल्यम बिगार्ट यांना ती श्रध्दांजली आहे. शिवाय वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या एका टॉवरवरील मोठ्या अॅन्टेनाचा भस्मसात अवशेष मध्यभागी ठेवून त्यासमोर त्या भयाण घटनेचे वार्तांकन विविध वृत्तपत्रांनी कसे केले होते, ते दर्शविणारी पहिल्या पानांची उंचच उंच गॅलरीच येथे आहे. सरकारला दोषी पिंजऱ्यात उभे न करता दहशतवाद्यांना ‘भ्याड हल्लेखोरांनो, वुई विल फाइट बॅक…’ असा इशारा देण्याची लाइन जवळपास सर्वच वृत्तपत्रांनी घेतल्याचे त्यातून जाणवते (
मटावरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here