बाॅम्बच्या अफवेनं धावपळ

0
665

मध्य रेल्वेच्या रोहा – दिवा पॅसेंजरमध्ये हर्षदा म्हात्रे नावाची महिला पिशवीत बॉम्ब घेऊन प्रवास करीत आहे, असा निनावी फोन आला. हा फोन रोहा पोलीस ठाण्यात खणखणला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलविलीत. मात्र, ही अफवाच असल्याचे तपासानंतर पोलिसांनी स्पष्ट केले.

मंगळवारी पहाटे रोहा पोलिसांना फोन आला की रोहा-दिवा पॅसेंजरमध्ये एक महिला पिशवीत बॉम्ब घेऊन बसली आहे. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली. रोहा प्रांताधिकारी तसेच तहसीलदार उर्मिला पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र तपासानंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. 

बॉम्बची माहितील असल्याचा फोन आल्यानंतर अलिबागहून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. या पथकात `लेलो` नावाचा डॉग होता. हे पथक घटनास्थळी दाखल झाले. पॅसेंजर रिकामी करण्यात आली आणि चार तासाच्या अथक प्रयत्नाने काहीच न सापडल्याने ती अफवा असल्याचे निष्पन झाले. हर्षदा म्हात्रे नावाची ही महिला त्या गाडीत नव्हतीच असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पहाटे रोहा स्थानकातून सुटणारीही पॅसेंजर ९.४० वाजता दिव्याच्या दिशेने सोडण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here