जालनाः पत्रकारावर हल्ला कश्यामुळं होईल याचा नेम नाही.विरोधात बातमी दिली म्हणून हल्ला झाल्याच्या घटना आपण रोज बघतो.मात्र बातमीत नाव नाही छापले म्ङणून ही आता पत्रकारावर हल्ले होऊ लागले आहेत.जालना जिल्हयातील विरेगाव येथे आज अशीच घटना घडली.पुण्यनगरीचे वार्ताहर गणेश सखाराम शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला.गणेशनं पुण्यनगरीत क्रिकेट लिगच्या सामन्यांच्या निकालाची बातमी तर दिली होती पण त्यात गावातील एका महाशयाचे नाव छापले नव्हते.या महाशयांनी माझं नाव मुद्दाम छापलं नाहीस असं सांगत गेणेशवर हल्ला केला.आता बोला…घटनेचा निषेध —