बलात्काऱ्यांना फाशीच…

0
711

मुंबईतील शक्तीमील परिसरात 22 ऑगस्ट 2013 रोजी एका महिला फोटो जर्नालिस्टवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात तीनही आरोपींना आज जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा ठाठावली आहे.बलात्काराची पिडिता जिवंत असतानाही आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली गेल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.दिल्लीच्या निर्भया प्रकरणातही आरोपींना फाशीची शिक्षा झाली मात्र त्यात पिडिता मरण पावली होती.आज न्यायालयाने दिलेलया निर्णयाचे सर्वथरातून स्वागत होत आहे.

कासिम बंगाली,महंमद सलिम आणि विजय जाधव या तीनही सराईत आरोपींनी फोटो जर्नालिस्टवर बलात्कार कऱण्यापुर्वी एका ऑपरेटरवरही बलात्कार केला होता.त्या प्रखरणातही आरोपींना जन्मठेप झालेली आहे.मात्र वारंवार एकच गुन्हा केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शन आणून दिले.त्यामुळे बलात्कार प्रकरणात नव्याने समाविष्ट कऱण्यात आलेल्या 376ई कलमान्तर्गतत ही शिक्षा ठाठावली गेली आहे.शिक्षाची सुनावणी सुरू असताना आरोपी हसत होते .या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here