प्रेयसीला अद्दल घडविण्यासाठी…

0
939

दिवा – सावंतवाडी गाडीने हर्षदा नावाची एक महिला बॉम्ब घेऊन प्रवास करीत असल्याचा फोन आल्यानं मंगळवारी रोहा स्थानकात तब्बल चार तास गाडी थंाबविण्यात आली.गाडीची कसून तपासणी केल्यानंतर काहीच आढळून न आल्याने गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
फोन करणाऱ्यांनं आपलं नाव अब्दुल्ला देशमुख असं सागितलं होतं.आपल्या विवाहित प्रेयसीला अद्दल घडविण्यासाठी त्यानं पोलिसांना फोन केला असल्याची माहिती पुढे आली आहे.अब्दुल्ला देशमुक अनिवासी भारतीय असून सध्या तो  सौदी अरबमध्ये राहतो.तो मुळचा रायगड जिल्हयातील महडचा रहिवासी असल्याचं समजतं.
दरम्यान या प्रकरणी अफवा पसरून सामांन्यांना त्रास दिल्याबद्दल अब्दुल्ला देशमुखवर कारवाई कऱण्याची मागणी होत आहे.पोलिस या प्रकरणी काय कारवाई करतात याकंडं आता साऱ्यंाचं लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here