प्रादेशिक पत्रे ‘धर्माला’ जागली

0
653

न्या.लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या बातम्या भलेही मेनस्ट्रिम मिडियानं दिलेल्या नसल्या तरी स्थानिक आणि भाषिक पत्रांनी मात्र न्या.लोया यांच्या मृत्यूच्या संदर्भातल्या बातम्या पहिल्या पानावर ढळकपणे छापल्या आहेत.मातृभूमीनं ही बातमी प्रसिध्द केली आहे.मनोरमानंही बातमी दिलेली आहे.कन्नड,तमिळ पत्रांनी देखील या बातम्या छापल्या आहेत.गुजरातमधील एका दैनिकानं ही बातमी दिली आहे.मात्र देशातील प्रमुख इंग्रजी आणि हिंदी दैनिकांनी आणि वाहिन्यांनी या बातमीकडं कानाडोळा केला आहे.भाषिक वृत्तपत्रे विशिष्ट भूमिका घेऊन काम करतात,ते आपला धर्म प्रामाणिकपणे निभावत असल्याचं सरकारला ज्ञात असल्याने सरकार या पत्रांची विविध पध्दतीनं गळचेपी करताना दिसत आहे.मोठी वृत्तपत्रे आपली भूमिका विसरले असताना भाषिक पत्रे मात्र जागल्याची भूमिका पार पाडत आहेत हे नक्कीच दिलासादायक आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here