सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करणारी एक पिढी महाराष्ट्राने पहिली आहे आणि प्रकाश बाळ जोशी हे त्या पिढीतील पत्रकार असून त्यांच्या साहित्यातही पददलित रंजल्या गांजलेल्या समाजातील घटकांचे समर्पक प्रतिबिंब पडलेले दिसते असे प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे सांगितले.
भाष्य प्रकाशनाने प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा या पुस्तकाला राज्य शासनाचा दिवाकर कृष्ण साहित्य पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा नागरी सत्कात आयोजित केला होता, त्या प्रसंगी आंबेडकर बोलत होते. त्यांच्या हस्ते मुलुंड येथील निमकर सोसायटी येथील रस्त्याचे कर्मवीर दादासाहेब संभाजी गायकवाड मार्ग असे नामकरण करण्यात आले.
आंबेडकबरोबर काम केलेल्या संभाजी गायकवाड यांच्या कामाचा परिचय करून देणाऱ्या बिल्डिंग द आंबेडकर रेव्होलुशन अँड संभाजी तुकाराम गायकवाड या पुस्तकाची सुधारित आवृत्ती हि त्यांच्या हस्ते प्रकाशित झाली.
जेष्ठ साहित्यिक अर्जुन दंगले यांनी प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा या वेगळ्या वाटेने जाणाऱ्या असून त्यात माणसाच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो असे नमूद केले. एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर आणि पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे यांनी प्रकाश बाळ जोशी यांनी पत्रकारिता करतांनाच स्वतःची कला जागवत कशी पुढे नेली यावर भाष्य केले.
या समारंभाला नेस इंटरनेशनल स्कूल चे डॉ. आर वरदराजन आमदार तारासिंग नगरसेविका समिता कांबळे विनोद कांबळे उपस्थित होते. भाष्य प्रकाशन चे महेश भारतीय यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि स्वाती भारतीय यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.त