चवदार तळे खटल्याची माहिती देणारा ग्रंथ प्रसिध्द होणार.

0
1726

रायगड जिल्हयातील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला विरोध करणार्‍या खटल्याची तपशीलवार माहिती देणारा खंड डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात प्रसिध्द होणार आहे.या खटल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरोपी असताना त्यांनी स्वतः युक्तीवाद करत हा खटला जिंकला होता.महाड कोर्ट ,अलिबागचे सेशन कोर्ट आणि नंतर हायकोर्ट अशा दहा वर्षे चाललेल्या या खटल्याचे दस्ताऐवज,न्यायालयीन नोंदी व कामकाज पध्दती याची माहिती पुस्तकाच्या रूपाने वाचकांना मिळणार आहे.400 ते 500 पानांचा हा खंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने तयार केला आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here