डॉ.नेरंद्र दाभोळकर याच्या मारेकऱ्यांचा तपास लावण्यासाठी गुलाबराव पोळ पुण्याचे पोलिस आयुक्त असताना प्लॅन्चेटचा उपयोग केला गेल्याची स्टोरी आऊटलुकने प्रसिध्द केल्यानंतर खळबळ माजली.मध्यंतरी आठ दिवस पोळ गप्प बसले.मात्र या प्लॅन्चेटचा ठोस पुरावा आशिष खेतान यांच्याकडं नसावा या समजुतीनं काल पोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आऊटलुक आणि खेतान यांच्याविरोधात आपण शंभर कोटींचा अबु्रनुकासानीचा दावा दाखल कऱणार असल्याचे जाहीर केले.त्यानंतर आज खेतान यांनी स्टींग व्दारे प्लॅऩ्चेटची केलेली संपूर्ण रेकॉर्डिंग एबीपीमाझाने दाखविल्यामुळे पोळ यांची पोलखोल झाली आहे.पुरावे दिल्यास कारवाई कऱण्याचे आश्वासन पुण्याचे कारभारी अजित पवार तसेच आर.आर.पाटील यांनी दिले होते आता खेतान यांनी पुरावे दिले आहेत दादा काय कारवाई करतात याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे.
डॉ.नेरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्य़भर अंधश्रध्देच्या विरोधात लढा दिला.त्यांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी अंधश्रध्देचा वापर केला जावा यासारखा दुसरा दैवदुर्विलास असू शकत नाही.पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यावर आता करावाई झाली पाहोज.