एका संपादकाचं “एन्काऊन्टर”

4
1307

थोडं खालच्या भाषेत बोलायचं तर संपादकाची अवस्था वेश्येपेक्षाही वाईट झालीय़. याची प्रचिती आणून देणाऱ्या घटना नियमितपणे आपल्या अवतीभवती घडत आहेत.वापरा अन सोडून द्या.गरज असते तोपर्यत संपादकाचे सर्व लाड पुरविले जातात.गरज संपली की,अत्यंत अपमानास्पदरित्या त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जातो.गेल्या पंचवीस वर्षात अशा पध्दतीनं बाहेर पडावे लागलेल्या किमान पंचवीस संपादकांची नाव मी सांगू शकेल.  मान्यवर संपादकांना अगदी गेटवरच त्याच्या हिशोबाचे चेक दिल्याच्या घटना या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत.अशा अनेक कथा मला आणि पत्रकारितेतल्या अनेकांना माहिती आहेत. ज्यांना अत्यंत अवमानास्पदरितीनं जावं लागलं त्यात मोठी,वलयांकीत संपादक आहेत. या यादीत निखिल वागळेंचे नाव आता समाविष्ट झाले आहे.सोमवारी दिवसभर त्यांची छबी असलेले प्रोमो दाखविले जात होते.”आज रात्री नऊ वाजता निखिल वागळे समवेत प्राईम टाइम”  अशीही जाहिरात दाखविली जात होती. हे प्रोमो पाहून दिवसभर व्हॉटस्‌ ऍपवर निखिल वागळे परतणारच्या बातम्या फिरत होत्या.मात्र रात्री अचानक निखिल वागळे यांचे ट्टिट वाचायला मिळाले. “मी राजीनामा दिला म्हणून”. (“Just resigned from IBN LOKMAT.  Will continue journalism without fear or favour!”    निखिल वागळे यांच्या राजीनाम्यावरची राजदीप सरदेसाई यांची प्रतिक्रिया अशी होती.   “@waglenikhil salute you for building India’s finest regional language channel.”    )  कारण काय? काहीच नाही.व्यवस्थापनाला वाटलं म्हणून… असं सांगतात की,एक महिन्याच्या रजेनंतर कामावर परत आलेल्या वागळे यांना व्यवस्थापनाने राजीनामाच द्यायला सांगितले.वागळेंचा नाईलाज झाला .त्यांना बाहेर पडावे लागले.मला विचाराल तर मी असं सांगेन की,वागळेंनी परत जायलाच नको होते.याचं कारण असं की,वागळे एक महिना नसताना सारं काही व्यवस्थित चालू होतं हे व्यवस्थापनाच्या लक्षात आलं.त्यामुळं व्यवस्थापनाच्यादृष्टीनं त्यांचं महत्वही कमी झालं होतं.त्याची परिणती राजीनाम्यात झाली.

हे सारं होतं,तरीही कुणाचं काम थांबत नाही.निखिल वागळे कधी जातात आणि त्याची जागा मी कधी मिळवतो अशी स्पर्धा संपादकात,पत्रकारात असते.आपलाही कधी तरी निखिल वागळे होणार हे माहिती असतानाही..अनेकजण प्रयत्न करीत राहतात.जगरहाटी यालाच म्हटलं जात असावं. पत्रकारितेतील एखाद्या संपादकाचं असं एन्कउन्टर झालं की दोन दिवस चर्चा होते.काही किाहीजण हळहळ व्यक्त करतात,काही दुखावलेले आनंद व्यक्त करतात.मग सारेच विसरून जातात.निखिल वागळेंच्या बाबतीतही असंच होणार आहे.पत्रकारिता व्यावसायिक झालीय,पत्रकारिता धंदेवाईक झालीय,धंद्याचे म्हणून जे दुष्परिणा असतात ते साऱ्यांनाच भोगावे लागत आहेत.पत्रकारिते सारखं अस्थिर,अनिश्चित दुसरं क्षेत्र नसावं.पत्रकारांच्या हक्कासाठीची आमची लढाई या सर्वांच्या विरोधात तर आहे…

वागळेंच्या बाबतीत बोलाल तर वागळेंचा व्देष करणारे अनेक जण आहेत.वागळे गेले याचा त्यांना आनंदही होईल.अर्थात कोणीच कोणत्या पदावर कायम नसतो त्यामुळे वागळे गेले हे निसर्ग नियमानुसारचं घडलंय.पण ज्या पध्दतीनं त्यांना जावं लागलं तसं व्हायला नको होतं,वागळेंवर नाराज असलेल्यांनी एवढं तरी मान्य केलंच पाहिजे.

4 COMMENTS

  1. निखिल वागळेंनी राजीनामा द्यायला नको होता.मान्य आहे कि त्यांची तात्विक घुसमट होण्याची शक्यता मोठी होती. पण काही तडजोड करुन जर आपल्याला संपादक पदाचे अधिकार वापरुन काही गोष्टी तर नक्कीच वापरता आल्या असत्या. आता ती शक्यता पण संपली

  2. Unfortunae.But i am sure we will see him again on some channel.I STARTED SEEING ibn because of NIKHIL,MY OLD FRIEND.tHOUGH WE HAD SCUFFLE ON SOME ACCOUNT.bUT IT IS BYGONE STORY.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here