रायगड जिल्हयातील पेण अर्बन बॅकेवर नेमण्यात आलेला अवसायक हटवून तेथे पूर्णवेळ प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने पेण बॅकेच्या लाखो ठवीदारांना दिलासा मिळाला आहे.
पेण अर्बन बॅ्रक संघर्ष समितीने या प्रश्नी सातत्यानं न्यायालयात आणि रस्त्यावरून पाठपुरावा सुरू ठेवला असून त्यांंच्या या प्रयत्नांना अखेर यश येताना दिसत आहे.बॅकेचे लायसन्स रद्द कऱण्याची कारवाई यापुर्वीच रिझर्व्ह बॅकेने केलेली आहे हे लायसन्स परत मिळविण्यात समितीला यश आले तर बॅंक पुनरूज्जीवीत व्हायला मदत होईल असे बोलले जात आहे.चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे.