महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तांनी पेण अर्बन बॅंक दिवाळखोरीत काढल्याचे काल उशिरा जाहीर केल्याने त्यांची संतप्त प्रतिक्रिया रायगड जिल्हयात उमटली असून सहकार आयुक्तांच्या या निर्णयाला आंदोलन आणि न्यायालयाच्या माध्यमातून आव्हान देण्याची तयारी जिल्हयातील ठेवीदारांनी केली आहे. पेण अर्बन बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीनं येत्या 13 मे रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.यावेळी सहकार आयुक्तांच्या लिक्विडेशनच्या आदेशाची होळी केली जाणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी दिली..त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्याची तयारी लगेच केली जात आहे
पेण अर्बन बॅेकेतील 758 कोटींचा घोटाळा सप्टेंबर 2010 मध्ये उघडकीस आला.तेव्हापासून 1 लाख 98 हजार ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून वेगवेगळ्या पातळ्यावर लढा देत आहेत.त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठेवी पर त मिळवून देण्याची आश्वासनंही दिली होती मात्र आता सहकार आयुक्तांनी बॅंक अवसयानात काढल्याचे जाहीर केल्याने ठेवीदारांच्या आशा मावळल्या आहेत.पेण बॅंकेत 128 बोगस कर्ज प्रकरणं करणाऱ्या 45 आजी-माजी संचालकांना अटक कऱण्यात आली होती मात्र तत्कालिन अध्यक्ष शिशिर धारकर यांच्यासह सर्वच संचालकांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
अवसायनात निघालेली पेण अर्बन बॅंक ही रायगडमधील तिसरी बॅंक आहे.