पुणे जिल्हा पत्रकार संघाचे रविवारी एकदिवसीय अधिवेशन

0
877

पुणे जिल्हा पत्रकार संघाचे रविवारी एकदिवसीय अधिवेशन

जिल्हयातील 11 ऋुषीतुल्य पत्रकारांचा होणार सन्मान 

पुणे दिनांक 28 (प्रतिनिधी)  मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हास्तरीय एकदिवसीय अधिवेशन रविवार दिनांक 3 जुलै रोजी हडपसर येथे संपन्न होत असून या अधिवेशानाचे  उद्दघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख असणार आहेत. यावेळी पुणे जिल्हयातील अकरा ऋुषीतुल्य,ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल  शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे.दिवसभऱात परिसंवाद,चर्चासत्र,खुले अधिवेशन आदि भरगच्च कार्यक्रम होत असल्याची माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

पुण्याचे महापौर प्रशांत जगताप,पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद,खा.सुप्रिया सुळे,खा.श्रीरंग बारणे,खा.अनिल शिरोळे,ज्येष्ट पत्रकार अनंत दीक्षित,परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक तसेच आ.योगेश टिळेकर, आणि अन्य मान्यवर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्हयातील पत्रकारिता समृध्द करण्यात अनेक ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान लाभले आहे.त्यापैकी सर्वश्री एस.के.कुलकर्णी,रामभाऊ जोशी,हॅरी डेव्हिड,वसंतराव गाडगीळ,वि.रा.उगले,चंद्रकांत दीक्षित,भाई रणशिंग,श्रीकांत देशपांडे,नंदकुमार कोरे,विलास जाधव आणि श्रीमती विद्याताई बाळ यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

दुपारी 2 वाजता “पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी अप्रस्तुत आहे काय?” या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे,निशिकांत भालेराव आणि न्यूज नेशनचे मुंबई ब्युरो चीफ सुभाष शिर्के आपली मतं माडंणार आहेत.त्यानंतर खुले अधिवेशन होणार असून जिल्हा पत्रकार संघाच्या संघटनात्मक बांधणी आणि पत्रकारांच्या प्रश्‍नावर यात चर्चा होणार आहे.यावेळी दिवाळी अंक स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास जिल्हयातून 600 वर पत्रकार उपस्थित राहणार आहेत.तसेच राज्याच्या अन्य भागातूनही पत्रकार अधिवेशनासाठी येत आहेत.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे,कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल, उपाध्यक्ष विनायक कांबळे आणि सरचिटणीस प्रभाकर क्षीरसागर,तसेच कार्यकारिणीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here