पुणे येथील आबेदा इनामदार शिक्षण संस्थेच्या संचालकांसह एकूण 17 जणांवर आज मुरूड जंजिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भादवि 304 (अ),34 या कलमान्वये हे गुन्हे दाखल केले गेले आहेत.ज्यांच्यावकर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यामध्ये पी.ए.इनामदार ,आबेदा इनामदार ,लतिफ मगदुम आदिंचा समावेश आहे.काही दिवसांपूर्वी आबेदा इनामदार शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची सहल मुरूडला गेली होती.त्यावेळी संस्थेचे 14 विद्यार्थी समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडले होते.शिक्षण संस्थेने योग्य ती काळजी घेतली नव्हती असे निष्पण्ण झाले आहे.त्यामुळे आज हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मुरूड पोलिसांनी ही माहिती दिली. –